सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा बंद ठेवणे म्हणजे प्रशासनाचे नियोजन शून्यतेचे लक्षण : दिपाली धुमाळ

पुणे शहरातील गुरुवार ६ ऑक्टोबर रोजीचा पाणीपुरवठा बंद रद्द करा : दिपाली धुमाळ
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रशासनाने गुरुवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी पूणे शहरातील पाणी पुरवठा विद्युत विषयक कामे करण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुळातच पाणीपुरवठ्या बाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत, त्यातच सणासुदीच्या दिवसात पाणीपुरवठा बंद ठेवणे म्हणजे प्रशासनाचे नियोजन शून्यतेचे लक्षण आहे असा आरोप करतानाच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने गुरुवारी बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा रद्द करावा अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.
धुमाळ म्हणाल्या, ज्या दिवशी पाणी पुरवठा बंद असेल त्या दिवसाच्या आदल्या दिवसापासुन ते पुढील दोन तिन दिवस नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही. त्याचबरोबर आधीच प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार पूर्वीपेक्षा दोन तास पाणी पुरवठा कमी होत आहे. गेले अनेक दिवसापासुन पुणे शहरात समान पाणी पुरवठा यचजने अंतर्गत एल अॅन्ड टी मार्फत पाईपलाईन चे काम फार मोठ्या संथ गतीने ढिसाळ पध्दतीने काम सुरू आहे त्यामुळे सुध्दा नागरिकांना पाणीपुरवठा कमी होत आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत.

बुधवार दि 5 ऑक्टोबर रोजी हिंदु संस्कृती मधील महत्वाचा सण म्हणजे दसरा (विजयादशमी) आहे अशा सणासुदीच्या वेळी नागरिकांना जर पुरेसा पाणी मिळाले नाही तर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होईल. त्यामुळे प्रशासनाने गुरुवारचा बंद पाणीपुरवठा रद्द करून सुरळीत पाणी पुरवठा करावा अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.






