कोथरुड

विशेष मुलांनी तयार केलेली राममंदिराची प्रतिकृती हे राम भक्तीचे सर्वोच्च कलश – चंद्रकांत पाटील

कोथरूड ; pune Kothrud “अब नार्मल होम” संस्थेच्या विशेष मुलांनी उभारलेली अयोध्येतील Ram Mandir श्रीराम मंदिराची प्रतिकृती ही कण कण में राम ची प्रचिती देणारे असून हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण आहे, ह्या प्रतिकृतीचे लोकार्पण करताना मला मनस्वी आनंद होत आहे, मी ह्या विशेष मुलांना अभिवादन करतो असे गौरवोदगार उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी काढले.

Img 20230717 wa0012281298961742807603730839

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुप यांच्या वतीने अब नार्मल होम संस्थेच्या विशेष मुलांनी तयार केलेल्या श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचे आज लोकार्पण करण्यात आले त्या कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, ग्लोबल ग्रुप चे संचालक राहुल बग्गा, शिक्षण समिती अध्यक्ष माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, संस्थेच्या संचालिका किशोरी पाठक, संस्थापक पंकज मिठभाकरे, युवा नेते मंदार बलकवडे, सरचिटणीस दीपक पवार, क्रीडा आघाडी संयोजक प्रतीक खर्डेकर, अनुभा वर्तक, जलतरंग वादक मिलिंद तुळणकर तसेच विशेष मुलं व विशेष मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Img 20231112 wa00053541767882370111537

व्वा अप्रतिम !! असे उद्गार सहजपणे चंद्रकांत पाटील यांच्या तोंडून बाहेर पडले आणि मग विशेष मुलांच्या प्रतिभेचे कौतुक करताना संस्थेच्या कार्याला भरभरून मदत करण्याचे वचन त्यांनी दिले. राजकारण करत असताना समाजकारण मौल्यवान असते आणि त्यातून आत्मिक शांती आणि काम केल्याचे समाधान मिळते असे सांगताना आज संपूर्ण देश राममय झाला असताना विशेष मुलांनी देखील शिक्षकांच्या साहाय्याने राममंदिर उभारले हे वेगळेपण तर आहेच पण परमेश्वर देखील माणसात कुठे काही कमी दिले तर त्याची भर इतर कला गुण किंवा कौशल्याच्या माध्यमातून करत असतो हेच हे सुंदर मंदिर बघताना जाणवते असे ही ते म्हणाले.

क्रिएटिव्ह फाउंडेशनचे सदस्य वर्षभर सेवा कार्यात व्यग्र असतात आणि दान हे सत्पात्री असावे व ते योग्य ठिकाणी गरजूपर्यंत पोहोचावे यासाठी आम्ही काम करतो असे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.समाजात दानशूर कमी नाहीत, आपणच त्यांच्या पर्यंत पोहोचण्यात कमी पडतो असे ही संदीप खर्डेकर म्हणाले. ह्या कॅलेंडर वर्षाची सुरुवात विशेष मुलांना मदतीचा हात देऊन करताना मनस्वी आनंद होत आहे असेही खर्डेकर म्हणाले. ग्लोबल ग्रुप सी एस आर आणि इतर माध्यमातून समाजोपयोगी कार्य करत असते असे ग्लोबल चे संचालक राहुल बग्गा म्हणाले. ज्या ज्या ठिकाणी गरज असेल तेथे आम्ही असू असेही त्यांनी स्पष्ट केले.

Img 20230511 wa0002282292969174931887579613

संस्थेच्या संचालिका किशोरी पाठक यांनी संस्थेची माहिती देताना सध्या 45 विद्यार्थी असून आम्ही विशेष विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देताना त्यांच्यातील कलागुणांना विकसित करण्याचा प्रयत्न करतो असे सांगितले.हे मंदिर तयार करताना शुभम गायकवाड याने विशेष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हे राममंदिर पुणेकरांना बघण्यासाठी आम्ही व्यवस्था करत आहोत व शक्य झाल्यास एका मोठ्या गाड्यावर हे मंदिर विविध चौकात दर्शनासाठी उपलब्ध करू असे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. तसेच ह्या मंदिरात स्थापित केलेली प्रभू श्रीराम, सीतामाता व लक्ष्मणाची सुंदर मूर्ती व विद्युत व्यवस्था अत्यन्त प्रेक्षणीय असल्याचेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये