वासुदेव भोसले यांच्या वतीने कश्मिर फाईल्स चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन..

वारजे : काश्मिरी पंडितांवरील अत्याचारावर आधारित असणारा कश्मिर फाईल्स चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन भाजपाचे पुणे शहर सरचिटणीस वासुदेव भोसले व रोहिणी वासुदेव भोसले यांच्या वतीने करण्यात आले होते.
कोथरूड मधील सिटीप्राईड चित्रपट गृहामध्ये या खास शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वारजे कर्वेनगर भागातील ५०० हून अधिक नागरिक कश्मिर फाईल्स चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांचेच मन हेलावून गेल्याचे पाहिला मिळाले.
वासुदेव भोसले यांनी सांगितले की, त्या काळात कश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे वास्तविक दर्शन या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. अभ्यासपूर्ण मांडणी असून त्यामधे कोणतीही अतिशयोक्ती नाही, तशीच ती अतिरंजित देखील नाही. सारासार विचार करायला लावणारी कलाकृती आहे. प्रत्यक्षात ज्यांनी या यमयातना भोगल्या, त्यांच्या विचारांनी मन खिन्न होते. त्यावेळची वास्तविक परिस्थीत लोकांना कळावी म्हणून या खास शोचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.




