महाराष्ट्रात तरुणांना मोफत लसीकरण, मात्र 1 मे पासून लसीकरण होणार नाही. लॉकडाउन देखील वाढणार – राजेश टोपे

मुंबई: राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे 1 पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या 1 मे रोजी राज्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात 1 मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही.
राज्यात 1 मे पर्यंत लागू असलेल्या लॉकडाऊन पुढेही कायम राहणार आहे. 1 मे नंतर पुढील 15 दिवस हे लॉकडाऊन कायम राहणार की किती दिवस वाढणार याचा निर्णय ३० एप्रिल रोजी होणार आहे. याबाबतीत मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.




