३५ जळीतग्रस्तांचे पुनर्वसन ; लोकसहभाग आणि वैयक्तिक मदतीतून आमदार सिद्धार्थ शिरोळेंची वचन पूर्ती

वडारवाडी- पांडवनगर ३५ जळीतग्रस्तांचे पुनर्वसन
पुणे : गेल्या वर्षी मार्च महिन्यात वडारवाडी -पांडवनगर भागातील आगीत ३५ झोपड्या जळाल्या होत्या. त्या सर्व जळीतग्रस्तांचे पुनर्वसन लोकसहभाग आणि वैयक्तिक मदतीतून आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केले. त्यांना स्वतःच्या हक्काची घरे आमदार शिरोळे यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.
या पुनर्वसनाने वचनपूर्तीचे समाधान लाभले, अशी भावना आमदार शिरोळे यांनी व्यक्त केली.

बसवेश्वर कल्याण मठ, वडार वडारवाडी येथे झालेल्या या वचनपूर्ती सोहळ्यास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रवीण दाबाडगांव, भा.ज.पा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक , भा.ज.पा पुणे सरचिटणीस दत्ता खाडे, दीपक नागपुरे, नगरसेविका नीलिमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, भा.ज.पा शिवाजीनगर अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, भा.ज.पा शिवाजीनगर सरचिटणीस गणेश बगाडे, प्रतुल जागडे, आनंद छाजेड, संघाचे पश्चिम महाराष्ट्र सयोजग बाळासाहेब दळवी, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, अपर्णा गोसावी, राम म्हेत्रे, सागर धोत्रे, अपर्णा कुराडे, राजेश धोत्रे, परेश क्षीरसंगे, किरण ओरसे, ओंकार केदारी, सुजित गोटेकर, सुनिता श्रीधर, सुभाष कदम, शशिकांत कुलकर्णी, दत्तू क्षीरसागर, दत्ता गोगुळु, अनिल पटोळे व कार्यकर्ते उपस्थित होते.



