केळेवाडीतील अल्पवयीन मुलाच्या खुनाचे रहस्य यामुळे उलगडले…
कोथरूड : kothrud news कोथरूड मधील केळेवाडी येथील बेपत्ता झालेल्या ११ वर्षीय मुलाचा १३ वर्षीय मुलाकडून खून झाल्याचा प्रकार पोलिसांनी उघड केल्यानंतर एकच खळबळ उडाली. खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कमी वेळात पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला होता. पण हा खुनाचा तपास करण्यात पोलिसांना केळेवाडी भागात लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही ची फार मोठी मदत झाली आहे. The mystery of the murder of a minor boy in Kelewadi was revealed due to this …
केळेवाडी मध्ये राहणारा ११ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी त्याचा मृतदेह परिसरातील एका मोकळ्या जागेत आढळून आला होता. त्याच्या डोक्याला मार लागल्याने खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर कोथरूड पोलिसांनी तपास चक्र फिरवत चौकशी सूरू केली. या तपासात १३ वर्षीय मुलाने हा खून केल्याचे पुढे आले होते.
पण हा तपास करताना पोलिसांना या भागात पालिकेने लावलेल्या सीसीटिव्ही मधून मिळालेल्या फुटेजची चांगली मदत झाली. काही सेंकदाच्या मिळालेल्या फुटेज मधून पोलिसांना धागेदोरे मिळाले आणि पोलिसांनी खुनी मुलाला ताब्यात घेतले.
केळेवाडी परिसरात नगरसेविका छाया मारणे यांच्या पाठपराव्यातून पालिकेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सीसीटिव्ही कॅमेऱ्यामुळे खून तपासात मदत झाल्याने पोलिसांनी आभार मानले असल्याचे मारणे यांनी सांगितले.
या संदर्भात अजय मारणे यांनी सांगितले की, आत्तापर्यंत संपूर्ण केळेवाडी परिसरात मुख्य रस्त्यावर व चौकात एकूण २२ कॅमेरे बसवले आहेत. अजून १५ कॅमेरे लावण्यात येणार आहेत. कॅमेरे बसवण्यात आल्यामुळे नेहमी होणारी पेट्रोल चोरी, भुरट्या चोऱ्या, मारामारी, वाहनांचे पार्ट चोरी करणे वाहनांचे नुकसान करणे आदी गोष्टींना आळा बसला आहे.