पैसे घेऊन आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश देतो म्हणणाऱ्या टोळ्या सक्रीय!..शिक्षण आयुक्तांनी प्रवेश प्रक्रिया पारदर्शक असल्याचा खुलासा करावा : राजेश पळसकर

पुणे : पुणे शहरात आर.टी.ई. ऑनलाइन प्रवेश प्रक्रीया सुरु झाली असुन काहि बोगस टोळ्या शहरात कार्यान्वित झाल्या असुन आम्ही आर.टी.ई. मधुन प्रवेश मिळवुन देतो असे सांगुन लाखो रुपये उकळुन पालकांची फसवणुक करीत आहेत. त्यामुळे आर.टी.ई. ऑनलाइन प्रवेश प्रक्रीया खरंच पारदर्शक आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी या बाबत खुलासा करावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
शिवसेना पुणे उपशहर प्रमुख राजेश पळसकर यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची भेट घेतली व आर.टी.ई. ऑनलाइन प्रवेश प्रक्रीयाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी युवासेनेचे शहर अधिकारी राम थरकुडे उपस्थित होते.
पळसकर म्हणाले, पुणे शहरात आर.टी.ई. ऑनलाइन प्रवेश प्रक्रीया सुरु झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे बोगस टोळ्या शहरात सक्रिय झाल्या आहेत. आम्ही आर.टी.ई. मधुन प्रवेश मिळवुन देतो असे सांगुन लाखो रुपये उकळुन पालकांची फसवणुक करीत आहेत. तसेच आम्ही शिक्षण मंडळात व जिल्हा परिषद शिक्षण विभागात कामाला असुन अधिकाऱ्यांशी आमची सेटींग असल्याची बतावणी केली जात आहे. मागील वर्षी देखील असे काही प्रवेश देण्यात आल्याची माहीती आमच्याकडे आली होती.

या पार्श्वभुमीवर आज राज्याचे शिक्षण आयुक्त श्री. सचिंद्र प्रताप सिंह यांची भेंट घेतली व प्रवेशप्रक्रिया पुर्णपणे ॲानलाईन व पारदर्शक होत असल्याचा दावा शासनाकडुन वारंवार करण्यात येत असतो . परंतु सदर प्रवेशप्रक्रीया खरच पारदर्शक पद्धतीने होते का याबद्दल शंका उपस्थित होत असल्याने या प्रक्रियेत मानवी अथवा कुठल्या अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करता येतो का ? याचा खुलासा करणे आवश्यक असल्याने त्वरीत याची दखल घेऊन सदर प्रक्रिया पारदर्शक असल्याचा खुलासा प्रसिद्धी माध्यमांद्वारे करावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. त्यावर शिक्षण आयुक्तांनीही मागणी मान्य करीत संबंधित अधिकाऱ्यांना प्रेसनोट काढुन प्रसिद्धीस देण्याचा आदेश दिला.
अशाप्रकारे प्रवेश देतो व पैशांची मागणी करित असेल तर आमच्याशी संपर्क साधावा . अशा प्रकारे कोणतेही आर.टी.ई. अतंर्गत प्रवेश होत नाहीत याची नोंद घ्यावी असे आवाहन राजेश पळसकर यांनी केले आहे. तसेच असे प्रवेश झाल्यास त्याचा पर्दाफाश केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.


