पुणे शहर

सोलापूरकरांची स्वप्नपूर्ती; सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू हवाईसेवा १५ ऑक्टोबरपासून सुरू! केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती 

२० सप्टेंबरपासून बुकिंग सुरू 

पुणे/सोलापूर : सोलापूरकरांची दीर्घ प्रतीक्षा संपली असून येत्या १५ ऑक्टोबरपासून सोलापूर विमानतळावरून सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू या दोन्ही मार्गांवर नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. तर बुकिंग २० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सोलापूरला मिळणारी ही दुहेरी भेट सोयीस्कर, वेगवान आणि आधुनिक वाहतुकीकडे एक मोठे पाऊल आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Img 20250508 wa00014407724251968801054

मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी उपलब्ध असणाऱ्या या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळुरूशी थेट व जलद हवाई संपर्क मिळणार आहे. व्यापारी, उद्योजक, विद्यार्थ्यांसह भाविकांसाठीही या नव्या सेवेमुळे प्रचंड सोय होणार आहे.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिजीएफ मंजूर केल्याने या सोलापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद ! मोदी सरकारच्या माध्यमातून या विमानतळाची निर्मिती केल्यानंतर प्रत्येक विमानसेवा सुरु करण्यासाठी आपले विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. ज्याला आता यश आले आहे. मुंबई आणि बंगलोर या दोन सेवा सुरु होणे, हा सोलापूरच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे.

Img 20250906 wa0042281292667080974856625006

‘सोलापूरसारख्या ऐतिहासिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहराला थेट मुंबई व बंगळुरूशी जोडणं ही काळाची गरज होती. या हवाईसेवेमुळे सोलापूरकरांचा प्रवास वेळ वाचणार आहेच, शिवाय या भागात गुंतवणूक, रोजगारनिर्मिती व पर्यटनाला चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेत सोलापूरचा अधिक प्रभावी सहभाग होईल, असा मला विश्वास आहे’

Img 20250918 wa00162721786118569806017

स्टार एअर उड्डाण वेळापत्रक:

• सोलापूर-मुंबई

प्रस्थान : दु. १२ः५५ वा.

• मुंबई-सोलापूर

प्रस्थान : दुपारी २:४५ वा.

• बंगळुरू-सोलापूर

प्रस्थान : सकाळी ११ः१० वा.

• सोलापूर-बंगळुरू

प्रस्थान : दुपारी ४:१५ वा.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते लोकार्पण…

मुंबई-सोलापूर विमानसेवेचा प्रारंभ १५ ऑक्टोबर, २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मुंबई येथून होणार आहे.

Img 20250913 wa02065865367835442147326

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये