महाराष्ट्र

छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकासकामांसाठी मंजूर निधीला स्थगिती; अजित पवार म्हणाले, “इतकं खालच्या पातळीचे राजकारण…”

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक विकासासाठी मंजूर झालेल्या निधीला स्थगिती दिली, असा राज्याचे विरोधीपक्ष नेते आरोप अजित पवार यांनी केला आहे. इतकं खालच्या पातळीचे राजकारण महाराष्ट्रात कधीही झाले नव्हते, अशी टीका त्यांनी केली आहे.

अजित पवार म्हणाले,”छत्रपती संभाजी महाराजांकडे एक शौर्य गाजवणारा राजा म्हणून आपण बघतो. महाविकास आघाडी सरकारने वढू-तुळापूर येथे त्यांचे स्मारक बनवण्याचे ठरवले होते. या स्मारकासाठी महाविकास आघाडी सरकारने निधीही मंजूर केला होता. त्याचा २६५ कोटींचा आराखडादेखील तयार झाला होता. मात्र, हा निधी राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. तसेच शाहू महाराजांच्या स्मारकासाठीही निधी दिला होता, तो देखील रद्द करण्यात आला आहे. शिंदे फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडी सरकारच्या काळातली अनेक मंजूर विकासकामे स्थगित करण्याचे काम सुरु आहे. ही कामे काही आमदारांच्या घरातली नव्हती. ही विकासाची कामे होती, इतकं खालच्या पातळीचे राजकारण महाराष्ट्रात कधीही झाले नव्हते.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये