पुणे शहर

एलईडी ई लर्निंग सेटचा नवभारत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी फायदा होणार..

रोटरी क्लब टिळक रोड यांच्यावतीने एलईडी ई लर्निंग सेट नवभारत हायस्कूलला भेट

पुणे : नवभारत हायस्कूल शिवणे या विद्यालयास रोटरी क्लब टिळक रोड शाखेच्या वतीने एलईडी ई लर्निंग सेट भेट देण्यात आला. या एलईडी ई लर्निंग सेटचा नवभारत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नक्की फायदा होईल अशा भावना कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केल्या.

या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब टिळक रोड शाखेचे माजी अध्यक्ष दादासाहेब सावळे, संचालक नीलिमा दाते, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी चारुदत्त भावे तसेच शाळेचे माजी विद्यार्थी कवी, महाराष्ट्र शासनाचा कामगार भूषण पुरस्कार विजेते राजेंद्र वाघ उपस्थित होते.

विद्यालयाचे प्राचार्य पी.एन.फापाळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात रोटरी क्लबच्या कार्याचा गौरव केला. रोटरी क्लब नेहमीच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नशील असते, या एलईडी ई लर्निंगच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी निश्चितच फायदा होईल. असे विचार व्यक्त केले.

Img 20230717 wa0012281291948762095496285435

चारुदत्त भावे यांनी देखील रोटरी क्लब दोनशे देशाहून अधिक देशांमध्ये कशा पद्धतीने सामाजिक बांधिलकी जोपासत सहकार्य भावनेतून सामाजिक कार्य करत आहे याची सर्वांगीण माहिती दिली. दादासाहेब सावळे, नीलिमा दाते यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

विद्यालयाचे माजी विद्यार्थी कवी राजेंद्र वाघ, विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका स्मिता अहिरे यांच्या संपर्कातून रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांमार्फत विद्यालयास ही भेट प्राप्त झाली. याप्रसंगी विद्यालयाचे परीक्षक डी.डी कुंभार, पोमन, नागवडे, सोनवणे व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र गोलांडे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार उपमुख्याध्यापक एस.बी.साबळे यांनी मानले.

Img 20230511 wa0002282295271751229740402775

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये