पुणे शहर

आमची ग्रामपंचायत आम्हाला परत द्या ; बावधनच्या माजी सरपंच पियुषा किरण दगडे पाटील आक्रमक..

आंदोलन करण्याचा दिला इशारा..

पुणे : बावधन बुद्रुक गाव पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाल्यापासून या भागातील नागरिकांना अनेक नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आम्ही महापालिकेत आता जास्त कर भरत आहोत पण योग्य सुविधा मिळत नाहीत. ग्रामपंचायत असताना कमी कर भरूनही सर्व सुविधा वेळेवर मिळत होत्या, त्यामुळे बावधन बुद्रुक गाव महानगरपालिका हद्दीतून वगळून पुन्हा एकदा ग्रामपंचायत म्हणून स्वायतता द्या अशी मागणी बावधन बुद्रुकच्या माजी सरपंच पीयुषा किरण दगडे पाटील यांनी केली आहे. मागणी मान्य न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

या संदर्भातील निवेदन किरण दगडे पाटील व पीयुषा किरण दगडे पाटील यांच्या वतीने महापालिका उपयुक्त नितीन उदास यांच्याकडे दिले आहे. आम्ही गेले एक वर्ष पुणे महानगरपालिकेला कर देत आहोत, परंतु आम्हाला त्यानुसार कुठल्याही सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत ना आम्हाला कुठल्या प्रकारचे बजेट मंजूर झाले आहे. आधी आम्हाला ग्रामपंचायतीला आतापेक्षा कमी कर द्यावा लागायचा परंतु आम्हाला सर्व सुविधा उत्तम आणि वेळेवर मिळायच्या. परंतु महापालिकेत समाविष्ट होऊन कर भरूनही सुविधा मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे किरण दगडे पाटील यांनी म्हंटले आहे.

ग्रामपंचायत असताना बावधन बुद्रुक गावातील घरातील कचरा, ग्रामपंचायत रोज मोफत उचलत होती.  परंतु आता महापालिकेकडून  ४-५ दिवसातून एकदा कचरा उचलला जात आहे.  परिसराची साफसफाई आणि झाडलोट देखील होत नसल्याने सर्वत्र अस्वच्छ पसरत आहे.  आधी रोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित व्हायचा पण तो आता अनियमित आणि कमी दाबाने होत आहे. पालिकेचे अधिकारी म्हणतात टँकरने पाणीपुरवठा सुरू करणार परंतु या आधी ग्रामपंचायतीला कधीही टँकर ने पाणी पुरवठा करण्याची गरज पडली नाही. त्यामुळे आम्हाला टँकरने
पाणी खरंच मिळेल का याची शाश्वती वाटत नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

गेले अनेक महिने आम्ही नवीन २५ लक्ष पाण्याच्या टाकी साठी निधीची मागणी करत आहोत परंतु ही मागणी देखील मान्य झालेली नाही. मनपा सार्वजनिक वापराचे वीज बिल देखील वेळेवर भरत नसल्यामुळे बावधन भागातील पथदिवे
सध्या सारखेच बंद असतात, या आधी पथदिवे कधीच बंद नसायचे कारण आमची ग्रामपंचायत नियमितपणे वीज बिल भरायची. आरोग्यसेवेचे देखील तीन तेरा वाजले आहेत. आमच्या समस्या सोडविण्यासाठी कोणीही जबाबदारी घेत नाही.त्यामुळे आमची विनंती आहे की बावधन भागाला महानगरपालिका हद्दीतून वगळून पुन्हा एकदा ग्रामपंचायत म्हणून स्वायतत्ता द्यावी जेणेकरून आमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील आणि आम्हाला पुणे महानगरपालिकेवर अवलंबून राहावं लागणार नाही. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा किरण दगडे पाटील व पीयुषा किरण दगडे पाटील यांनी दिला आहे.

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये