पुणे शहर

मराठी भाषेतील गीतरामायणाचे वैभव आता हिंदीत;गदिमांच्या जयंतीनिमित्त कोथरूड मध्ये पहिल्या प्रयोगाचे आयोजन, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा विशेष पुढाकार

कोथरूड : आधुनिक वाल्मिकी गदिमा आणि श्रेष्ठ संगीतकार सुधीर फडके या दोन कलाकारांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेली ‘गीतरामायण’ ही कलाकृती म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अमोल असे वैभव! या वैभवाचा लाभ संपूर्ण भारत वर्षाला मिळावा यासाठी त्याचा भावानुवाद हिंदी भाषेत करण्यात आले असून, त्याचा देशातील पहिला प्रयोग १ ऑक्टोबर रोजी कोथरूड मध्ये आयोजित करण्यात आला आहे. यासाठी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.

प्रभू रामचंद्राची कथा अजरामर आहे. अनेक ‌कवींनी, साहित्यिकांनी साहित्याच्या विविध प्रकारातून ती गुंफली आहे. परंतु, गजानन दिगंबर माडगूळकर यांनी हे काव्यबद्ध करत त्यातील भावसौंदर्य वाढवले आहे.

Img 20240404 wa001528129

कारण, मानवी ‌जीवनविषयक तात्विक मौलिक विचार सहजसुलभ भाषेत गीतरामायणातून व्यक्त झालेले आहेत. गीतरामायणात सुबोध भाषेत बोध आहे. विविध व्यक्तीमत्वाचे प्रभावी स्वरुपाचे चित्रण यामधून गदिमांनी केले आहे. संभ्रमित मनाला जीवनमूल्यांची ओळख गीतरामायणाने करून दिली आहे. त्यामुळे हे वैभव संपूर्ण देशाला लाभावे यासाठी प्रसिद्ध गझलकार देवदत्त जोग यांनी हिंदी भाषेत भावानुवादित केले आहे. याला भारत सरकारने ही प्रायोजकत्व दिले आहे.

गदिमांच्या १०५ व्या जयंतीचे औचित्य साधून नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरुड मध्ये याचे आयोजन करण्यात आले असून; १ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०९.३० वा. ते १२.३० वा. या वेळेत कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा सर्व रामभक्त आणि गदिमा प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Img 20240404 wa0012281298841886320058264868
Img 20240404 wa0013281291032765212350995267

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये