भाजपच्या वतीने कृतज्ञता यात्रा उत्साही वातावरणात संपन्न ; माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा सहभाग

कोथरूड : माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व राष्ट्रपिता महात्मा गांधी या उभयतांच्या जयंतीचे औचित्य साधत नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसा निमित्त स्विकृत नगरसेविका अँड् सौ मीताली कुलदीप सावळेकर व संयोजक, बूथ समिती, भा ज पा, पुणे शहर श्री कुलदीप सावळेकर यांच्या संकल्पनेतून नागरिकांच्या हिताच्या अनेक योजना राबविणा-या व अनेक ऐतिहासिक धाडसी निर्णय प्रत्यक्ष अमलात आणणा-या मोदीजींबद्दल अभिनव पध्दतीने पदयात्रे द्वारे नागरिकांमार्फत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
सदर कृतज्ञता यात्रेत सहभागी नागरिकांनी मोदीजींच्या योजना व निर्णय याबाबतचे फ्लेक्स हातात धरून नळस्टॉप चौक ते सावरकर स्मारक (डेक्कन) या मार्गावर ही पदयात्रा काढली.अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलेल्या या पदयात्रेत २०० हून अधिक नागरिक उपस्थित होते.

यात्रेची सुरूवात शंखवादन व मंत्रोच्चाराने मंगलमय वातावरणात झाली व त्याचा समारोप माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचा-यांचा सन्मान करून झाली.सदर कार्यक्रमात जावडेकर म्हणाले, “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्वच्छतेचा विचाराची दृष्टी व सामाजिक भान हे ख-या अर्थाने मोदींनी साकारले व पुढे नेले तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी नारा दिलेल्या जय जवान जय किसान या घटकांबरोबरच इतर सर्वसामान्य जनतेतील प्रत्येक घटकासाठी उत्तम योजना व अभिनानास्पद काम केले आहे व ह्याबाबत इतक्या संख्येने आपण कृतज्ञता व्यक्त करत आहात यातचं त्याचे यश सामावले आहे”
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अँड् मीताली सावळेकर म्हणाल्या,” मोदींजींच्या योजना व निर्णय नागरिकांपर्यंत पोहोचवणे व त्याबाबत मोदीजींनी प्रति कृतज्ञता व्यक्त करणे ही प्रामुख्याने संकल्पना होतीसदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुलदीप सावळेकर यांनी केले तर आभार अँड् प्राची बगाटे यांनी मानले.
पुण्यात रस्त्यावरील चेंबर मध्ये १५ फूट खोल खड्ड्यात पडला माणूस.
सदर उपक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे तुषार कुलकर्णी नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे, पुनीत जोशी, मंदार रेडे,जयश्री तलेसरा, श्रीपाद गोहाड, अतुल गळंगे, प्रशांत बनकर डॉ संदीप बुटाला, मिलींद एकबोटे, रूपाली मगर, जागृती कणेकर, सुनिती जोशी, सरोज जोशी, मंगल शिंदे, संगिता आधवडे, विठ्ठल मानकर, समीर ताडे, जगदीश डिंगरे, अश्विनी कुलकर्णी, नीता भालेकर, वैशाली वेदपाठक, कुंदा बिडकर, रामदास गावडे, विनय सुभेदार, कल्याणी खर्डेकर, हर्षदा फरांदे, राजू येडे, सौरभ अथनिकर, नामदेव पवळ, कुणाल तोंडे, सुनिल अभंगे, निलेश घोडके, शंतनू खिलारे, अशोक चव्हाण, पांगारकरकाका, सुभेदारकाका, सिधये काका, यांच्यासह अनेक सोसायट्याचे पदाधिकारी, जेष्ठ नागरिक संघातील सभासद हे ही उपस्थित होते



