महाराष्ट्र

प्रा. हरी नरके मृत्यू प्रकरण; लेखक संजय सोनवणींची डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी

पुणे : ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या मृत्यूबाबत लेखक संजय सोनवणी यांनी शंका उपस्थित केली आहे. हरी नरके यांच्यावर चुकीचे उपचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. दोषी डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई का होऊ नये?, असे संजीव सोनवणी यांनी म्हटलं आहे.

डॉक्टर प्राणदान करण्यासाठी असतात की प्राण घेण्यासाठी यावर गंभीर विचार झाला पाहिजे. डॉक्टरांनी lAB रिपोर्ट्सकडे दुर्लक्ष करून त्यांच्या आजाराचे चुकीचे निदान केले. जवळपास 10 महिने त्यांच्यावर चुकीचे औषधोपचार झाले. यामुळे मूळ आजार बळावून हरिभाऊ अकाली गेले. यामुळे पुरोगामी विचारपर्वाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. हरिभाऊ राष्ट्रीय वैचारिक संपत्ती होते. त्यांचा मृत्यू सदोष मनुष्यवधाचा प्रकार आहे. दोषी डॉक्टर्सवर कायदेशीर कारवाई का होऊ नये?, असे संजय सोनवणी यांनी म्हटले आहे.

Img 20230803 wa00041486684870724290474

यापूर्वी संजय सोनवणी यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली. ती पुढील प्रमाणे :

प्रतिक्रिया द्यायला माझ्याकडे शब्द नाहीत.

हरीभाऊंचा मला आलेला २२ जून २०२३चा whatsapp संदेश-

“प्रिय भाऊ, नमस्कार
गुजरात जामनगर ला 3 आठवडे ट्रीटमेंट घेऊन
पुण्यात घरी पोचलो आहे. अंगात थोडा ताप आहे. खूप अशक्तपणा आहे. बीपी लो आहे.

आधी हातापायावर खूप सूज होती. शरीरात 20 किलो पाणी ज्यादाचे साठले होते. त्यामुळे किडनी व हार्टवर प्रेशर येऊन श्वास घ्यायला खूप त्रास होत होता.

ट्रीटमेंटमुळे 20 दिवसात 20 किलो पाणी ड्रेन झाले. त्यामुळे श्वास पूर्ण मोकळा झाला.

मात्र बीपी 60 90 असे लो असून विकनेस खूप आहे. लीलावती हॉस्पिटलच्या नामवंत डॉक्टरांच्या निष्काळजीपणे 10 महिने त्रास सहन करावा लागला. शिवाय हार्टफेल व किडनी फेलच्या धोक्याच्या 4 थ्या स्टेजवर आलो होतो.

जास्तीत जास्त 2 महिने लाईफ मिळाले असते.

हार्टफेल व किडनी फेलने मृत्यू निश्चित होता.

लीलावतीमधील नामवंत Cardeologist, pulminologist खूप लॅब रिपोर्ट मागवतात पण ते वाचत नाहीत. त्यामुळे हार्ट नॉर्मल आहे. किडनी नॉर्मल आहे. असे अँजिओग्राफी करून लेखी रिपोर्ट दिलेत त्यांनी. परिणामी फॉलोअपला पुण्याचे डॉ. अभिजित वैद्य, महेंद्र कावेडिया, औरंगाबादचे डॉ. आनंद निकाळजे सगळेच चुकले.

लीलावतीवाले हार्टऐवजी मला नसलेल्या अस्थमावर उपचार करीत राहिले. पण धाप लागणे वाढतच गेले. धोका वाढतच गेला. regards.
[14:29, 22/06/2023] Hari Narke 2: हा लिलावतीचा लॅब रिपोर्ट सांगतो हार्ट फेलचा धोका आठपट आहे .. पण त्यांनी वाचलाच नाही.आणि ऑल ओके असा चुकीचा रिपोर्ट लिहून दिला. तो 10 महिन्यात 21पट झाला होता.
आता बरा होतोय.”

माझा हसता खेळता ज्येष्ठ बंधू गेला. काय म्हणू?

Img 20230511 wa000228129

लीलावती रुग्णालयाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. रविशंकर यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो, असे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये