कोथरुडमधील मामासाहेब मोहोळ शाळेतील विद्यार्थ्यांचे हर्षवर्धन मानकर यांच्या वतीने स्वागत..

कोथरुड : दीड वर्षानंतर शाळा सुरू झाल्याने कोथरुडमधील केळेवाडीतील मामासाहेब मोहोळ शाळेतील विद्यार्थ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्या वतीने पेन व मास्क वाटप करून स्वागत करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका करुणा पाठारे, मनिषा पाटील, सुमेघा खडतरे, अनिता मारणे, स्मिता डोंगरे, राधिका दगडे तसेच मयूर घोडके, बाळासाहेब पिसाळ, संजय भगत, बापू जगताप, जावेद शेख, प्रसन्न गायकवाड, नितिन निवंगुणे आदी उपस्थित होते. दीड वर्षानंतर विद्यार्थी शाळेत येणार म्हणून शिक्षक व दीवा प्रतिष्ठान चे कार्यकर्ते मुलांच्या स्वागतासाठी आतुरतेने जमले होते. यावेळी मुलांना भेट म्हणून पेन वाटप करण्यात आले.
कोरोनामुळे बराच काळ शाळा बंद असल्याने मुले घरी अभ्यास करून कंटाळली होती. त्यांनाही कधी शाळा सुरू होतील असे झाले होते. आखेर शाळा सुरू झाल्याने मुलांनी उत्साही व आनंदी वातावरणात शाळेत प्रवेश केला आहे.




