राष्ट्रीय

महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

कर्नाटक सरकारनं लाल पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं, एकनाथ शिंदेंचा इशारा; बंगळुर मधील गुंडांचा तीव्र निषेध

मुंबई: कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेचा निषेध केला आहे. कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो, असं ते म्हणाले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहेस, असंही ते म्हणाले.

कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. म.ए.समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे.

कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करत असून महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Img 20211129 wa0128

बेळगावात अधिवेशनाचा घाट घालणाऱ्या कर्नाटकचा सरकारचा निषेध

कर्नाटक सरकारने बेळगाव वर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातलाय त्याचाही तीव्र निषेध करत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. बंगळुरु मधल्या गुन्हेगाराला तातडीने अटक व्हावी आणि अनधिकृत लाल पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केलीय आहे.

महाराष्ट्र तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही

मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढ्यांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देखील एकनाथ शिंदे यांनी दिला.

नेमकं प्रकरण काय?

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. बंगळुरुतील एक चौकातील हा पुतळा आहे, त्याची गुरूवारी रात्री विटंबना करण्यात आल्याची माहिती आहे. त्या घटनेचे चित्रिकरण केले आणि तोच व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये