
पुणे : रहिवाशांची नावे स्वत:च्या रेशन कार्डवर वाढवून त्यांच्या नावाने फेरीवाला परवाने मिळविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महापालिका अधिकारी अतिक्रमण निरीक्षक महेश मारणे यांनी कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद (गु. रजि. नं. १०४/२३) दिली आहे.त्यानुसार पोलिसांनी कैलास विठ्ठल भिंगारे
(वय ५९, रा. रामबाग कॉलनी, पौड रोड, कोथरुड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागात २०१४ ते ३१मार्च २०२३ दरम्यान घडला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास भिंगारे यांनी स्वत:च्या
आर्थिक फायद्यासाठी त्यांचे नातेवाईक हे पुण्यात रहात नसताना स्वअधिकारात स्वत:चे नावे असलेल्या रेशन कार्डमध्ये नातेवाईकांची नावे वाढविली. रेशन कार्डमध्ये फेरफार केला.ती शासकीय कागदपत्रे खरी असल्याचे भासविले. अर्जामध्ये अर्जदारांचे फोटो न लावता इतर व्यक्तींचे फोटो लावून खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले.
त्या आधारे फेरीवाला नावाचे परवाने प्राप्त केला. त्याचा वापर करुन स्वत:ला आर्थिक फायदा प्राप्त करुन परवाने
पुणे मनपाकडे जमा केले आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक पांढरे तपास करीत आहेत.







