वारजेत आरोग्य शिबीरात ७५० नागरिकांची तपासणी ; देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन..

वारजे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वारजे माळवाडी येथे आरोग्य सेवा देण्याच्या संकल्पातुन आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ७५० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिरात मोफत कॅन्सर तपासणी, पाईल्स, फिशर,
हारण्या, मुळव्याध तपासणी तसेच नेत्र तपासणी, मोतीबिंदु तपासणी शस्त्रक्रिया शिबीर, मोफत चष्मे वाटप इत्यादी तपासण्यांचा समावेश होता. सदर सेवा शिबिरात नागरीकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला व तपासण्या करुन घेतल्या. शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक किरण बारटक्के यांनी केले होते.
या प्रसंगी आमदार भिमराव तापकिर यांनी शिबिरास भेट दिली. परिसरातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले. यावेळी ह.भ.प नारायण महाराज गोरे, जेष्ठ मार्गदर्शक नाना काटे, वर्धमान जैन श्रावक संघाचे अध्यक्ष पारस छाजेड, खडकवासला म सं अध्यक्ष सचिन मोरे, सुधाकरजी मोडक, विवेक छावजी, नाना सोनवणे, दिनेश लुणावत, सुरेश शिगवण, बाप्पु माने आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक ऊनकुले यांनी केले तसेच .आभार धनंजय बांद्रे यांनी मानले.




