एक झाड पुढील पिढीसाठी अंकूर प्रतिष्ठानचा उपक्रम संपन्न

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या साथीने जागतिक पर्यावरणाच्या निमित्ताने अंकूर प्रतिष्ठानच्या एक झाड पुढच्या पिढीसाठी या उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध ठिकाणी एकूण ६१ रोपांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. ज्याची सुरूवात आज विनीत सोसायटीतील गार्डन मध्ये चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चाफ्याचे झाड लावून करण्यात आली. तसेच तिथे एकूण २५ झाडे लावण्यात आली. सोसायटीच्यावतीने खास दादांच्या वाढदिवसानिमित्त बकुळीचे झाड ही लावण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांनी बोलताना आजच्या या कोरोनाच्या संकटकाळात वृक्षारोपणाची किती व का आवश्यकता आहे तसेच झाडे लावणे व ती जगवणेही खूप गरजेचे असल्याचे सांगितले व उपक्रमाचे कौतुक केले व वृक्षारोपणाबरोबरचं संवर्धन देखील करत असल्यामुळे आयोजकांचे व सोसायटीतील नागरिकांचेही विशेष अभिनंदन केले.

स्विकृत नगरसेविका अँड् सौ मीताली सावळेकरांनी प्रास्ताविक करताना सांगितले की यापूर्वी या उपक्रमाचा एक भाग म्हणून कोरोनाच्या संकट काळात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, तसेच ताथवडेंच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते, तसेच विविध नागरिक व ग्रुप्स च्या सोबत शिवाय अनेकांनी आपापल्या घरी अशी एकूण १२५ हून अधिक झाडे लावण्यात आली व सदर उपक्रम १५ ऑगस्ट पर्यंत चालू राहणार असल्याचेही सांगितले यावेळी श्री कुलदीप सावळेकर यांनी सुत्रसंचालन केले व समीर ताडे यांनी आभार मानले.
याचे नियोजन कुलदीप सावळेकर अध्यक्ष भा ज पा, बूथ समिती, पुणे शहर व स्विकृत नगरसेविका अँड् सौ मीताली कुलदीप सावळेकर यांच्यामार्फत करण्यात आले होते.
सदर उपक्रमास सुधीर थोरात यांच्यासहीत विनीत सोसायटीचे अनेक पदाधिकारी व नागरीक तसेच भा ज पा चे नगरसेवक मा दीपक पोटे, मंजूश्री खर्डेकर, माधुरी सहस्त्रबुध्दे,जयंत भावे, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, भा ज पा प्रवक्ते पुणे शहर संदीप खर्डेकर, पुणे शहर महिला आघाडी सरचिटणीस गायत्री भागवत, पुणे शहर वकिली आघाडीच्या अँड् मोहना गद्रे, कोथरूड मतदार संघाच्या सरचिटणीस अनुराधा एडके, महिला आघाडीच्या रमा डांगे, उपाध्यक्ष राज तांबोळी, ज्येष्ठ पदाधिकारी जनार्दन क्षीरसागर, गिरीष खत्री, महेश पोवळे, संतोष लांडे, अमोल डांगे, दीपक पवार, गौरी करंजकर, अपर्णा लोणारे, कोथरूड मतदार संघाचे मुकेश अनिवासे, सायंदेव देहाडराय, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे, सरचिटणीस अँड् प्राची बगाटे, निलेश गरूडकर, बाळासाहेब धनवे, ज्येष्ठ नागरीक आघाडीचे श्रीपाद गोहाड, वैभव जमदाडे, श्रीकांत गावडे, जगदीश डिंगरे, हेमंत बोरकर, कुणाल तोंडे, समीर ताडे, किरण देखणे, जयश्री तलेसरा, जागृती कणेकर, अक्षय कुलकर्णी, दीपक आवाडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे सोसायटीतील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्वाधार बचतगटातर्फे शालीपासून बनविलेले जाकीट भेट म्हणून देण्यात आले.त्याचप्रमाणे या महिन्यात वाढदिवस झालेले प्रभागाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष सौरभ अथनिकर यांच्या हस्ते देखील झाड लावण्यात आले.



