पुणे शहर

वारजे भागातील गुंडाच्या टोळी विरोधात मोक्का कारवाई

वारजे माळवाडी : वारजे आणि एनडीए रस्ता परिसरात दहशत माजविणारा गुंड गणेश उर्फ शिऱ्या वाघमारे याच्यासह साथीदारांच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यावन्ये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.

गणेश उर्फ शिऱ्या वाघमारे (वय २१), सचिन शंकर दळवी (वय २३), सुरज राजू मारूडा (वय २१), रखमाजी परमेश्वर जाधव (वय १९), प्रतीक संजय नलावडे (वय २१). समीर नरहरी कांबळे (वय १८) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. वाघमारे आणि साथीदारांनी वारजे, उत्तमनगर भागात दहशत माजविली होती. या टोळीच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, लूट असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर वाघमारे आणि साथीदारांच्या वर्तणुकीत बदल झालेला नव्हता. उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी वाघमारे आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव परिमंडळ तीनच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे सादर केला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी वाघमारे आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्तावास मंजुरी दिली.

Img 20220708 wa00011330202002021897215

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये