महाराष्ट्र

पुण्यासह राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

पुणे : मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, कोकणातील अनेक जिल्ह्यांसह राज्याच्या मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता.14 )कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे मुंबई, रायगड, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याती विविध भागात पावसाची शक्यता आहे. वायव्य अरबी समुद्रापासून गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल ते बांगलादेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. महाराष्ट्र गोव्याच्या किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे कोल्हापूरसह कोकणातील जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. याचबरोबर नद्यांना पुराच्या पाण्याचा विळखा बसल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे असलेल्या मान्सूनची आस, महाराष्ट्राच्या किनाऱ्याला समांतर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज (ता.14) दक्षिण कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, दक्षिण महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर उर्वरित कोकणात जोरदार पावसाचा (येलो अलर्ट) अंदाज आहे. याबाबत हवामान खात्याने माहिती दिली आहे. यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे सांगण्यात आले आहे.

Img 20220913 wa00104794122568839944278
Img 20220910 wa0003

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये