हेल्पिंग हॅण्ड कोथरूडचे अंध शाळेत स्वातंत्र्यदिन आणि अनोखी राखीपोर्णिमा साजरी

११० विद्यार्थिनींना झेंडे, फुगे, खाऊ आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कोथरूड: हेल्पिंग हॅण्ड कोथरूडच्या वतीने पूना स्कुल फॉर ब्लाइंड गर्ल्स’ (कोथरूड) मध्ये दृष्टीहीन विद्यार्थिनींनी ‘स्वातंत्र्यदिन आणि अनोखी राखीपोर्णिमा साजरी केली.जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच खाऊ, झेंडे आणि फुगे देऊन शाळेचे वातावरण आनंदमय झाले असे हेल्पिंग हॅण्डचे गुरनानी म्हणाले.
‘समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा होता’असे हेल्पिंग हॅण्ड कोथरूड अध्यक्ष गिरीश गुरनानी म्हणाले.’झेंडा, फुगे, खाऊ आणि जीवनावश्यक वस्तू मिळाल्यानंतर मुलींच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देणारा होता.
त्यांच्या कडून राखी बांधून घेत असताना त्यांच्या आशा आकांक्षा किती मोठ्या आहेत आणि स्वतंत्र जगण्याची उमेद किती जागृत आहे याची अनुभूती झाली असे हेल्पिंग हॅण्ड कोथरूड चे अध्यक्ष गिरीश गुरनानी म्हणाले संस्थेला काही आर्थिक मदत देखील केली. माझ्या या भगिनींना या जगात स्वतंत्र पणे जगता यावे याची जबाबदाऱ्या अपना सगळ्यांच्या खांद्यांवर आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हीच सदिच्छा आणि प्रार्थना.या वेळी अमोल गायकवाड ,अमित भगत , आधिराज कसबे, प्रीतम पायगुडे,अद्वैत कोंढरे,रोशनी साबळे आदी उपस्थित होते.













