चार महिन्यांत निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालय;सर्वोच्च न्यायालयाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली: मुंबई : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते .सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंबंधी याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली आहे.या सुनावणीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल कधी वाजणार? हे स्पष्ट झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ‘चार महिन्याच्या आत निवडणुका घ्या’ असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक ठराविक वेळेत घ्या. उर्वरित वादाचे मुद्दे टाळण्याचे कोर्टाने निर्देश दिले आहेत. “आधीच्या परिस्थितीनुसार १९९४ ते २०२२ च्या परिस्थितीनुसार लोकल बॉडीचे इलेक्शन घेतले जातील. राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला सप्टेंबरच्या आत निवडणूक घ्यायची आहे” असं वकील सिद्धार्थ यांनी सांगितलं.
कोरोना संकटामुळे मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. प्रशासकाद्वारे या सर्व महापालिकांचा कारभार चाललेला. याविरोधात डिसेंबर २०२१ मध्ये राहुल वाघ यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर तब्बल चार वर्षांनंतर न्या. सूर्य कांत आणि न्या. नाँगमेईकपम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
बातमी update होत आहे….



