कोथरुड

विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीचा ध्यास असणे गरजेचे : डॉ. विजय भटकर

भाजप व संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

कोथरुड : विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मार्क जास्त पडत असले तरी त्यांच्याकडे सर्जनशीलता creativity व नावीन्यता innovation हे गुण असणे फार गरजेचे आहे. असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पक्ष आणि संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात भटकर यांच्या हस्ते कोथरूड कर्वेनगर वारजे परिसरातील १० व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी एमकेसीएलचे संचालक विवेक सावंत आणि डॉ. भटकर यांनी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन मोलाचे केले.

कोथरुडच्या ‘यशवंतराव’मध्ये झालेल्या या गौरव समारंभाचे यंदा १८ वे वर्ष असून यावेळी ७०० पेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना कौतुकाची थाप देण्यात आली. यावेळी माजी महापौर व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ,  माजी नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड यांच्यासह विद्यार्थी, पालक,पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

भटकर म्हणाले आय आय टी मधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अभिनव शोध लावणारे विद्यार्थी फार कमी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे हटके विचार करण्याचा गुण, नवीन आविष्कार करण्याची शक्ती असणे गरजेचे असून आपण  creativity वर जास्त भर देणे आवश्यक आहे. मला कधीही जास्त गुण पडले नाहीत पण आम्ही कायम नाविन्याच्या शोधात होतो. मी जेव्हा पहिला रेडिओ तयार केला व त्यावर विवध भारतीचे स्टेशन लागले त्यावेळी झालेला आनंद न सांगता येणार आहे. नवीन काही करत असताना काही चुका झाल्या तरी आईने कायम पाठिंबा दिला.

Fb img 1647413711531

पुढे भटकर म्हणाले, गुणवंत विद्यार्थी म्हणजे तो नाही ज्याने परीक्षेत १०० पैकी १०० गुण मिळवले तर जो प्रतिभाशाली आहे, जो नवनिर्मिती करू शकतो तो खरा गुणवंत असे मला वाटते. त्यामुळे प्रतिभाशाली मुल तयार करणं महत्वाचं असल्याचे ते म्हणाले. महासंगणक कसा तयार झाला याबाबतही त्यांनी मुलांना सांगितले.

विवेक सावंत म्हणाले, परीक्षेत अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित उत्तरे दिली की पास होता येते. याच्यापुढे जाल त्यावेळी तुम्हाला जीवनात रोज अनपेक्षित प्रश्नांना अनपेक्षित रित्या नाविन्यपूर्ण उत्तरे कमी वेळात देता आली तर तुम्ही यशस्वी होणार आहात.

प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचे आयोजक मुरलीधर मोहोळ म्हणाले की,  समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी व त्याची जाण ठेवून संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही पुण्याच्या पश्चिम भागात सर्व वयोगटासाठी सामाजिक, सांस्कृतिक, विधायक असे अनेक उपक्रम राबवत आहोत. गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक समारंभाचे हे अठरावे वर्ष असून जीवनाच्या महत्वाच्या टप्प्यावर असताना या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं आपल्या आयुष्याची दिशा ठरवता यावी हा या कौतुक व मार्गदर्शन कार्यक्रमा मागचा मुळ हेतू आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये