महाराष्ट्र

एकनाथ खडसे यांचा भाजपला रामराम ; गुरुवारी राष्ट्रवादीत करणार प्रवेश

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. अखेर खडसे यांनी भाजपला रामराम करत भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश गुरुवारी निश्चित झाला असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली आहे.

एकनाथ खडसे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे त्याबाबत माध्यमांमधून अनेक तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या मात्र खडसेंनी याबाबत बोलण्यास नकार दिला होता.

खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. तसेच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची त्यांनी भेट घेतली होती.त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली होती त्याच वेळी त्यांच्या प्रवेशाचे निश्चित झाली असल्याचे सांगण्यात येते.

गुरुवारी मुंबई राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश झाला निश्चित झाला असल्याचे सांगण्यात येते.मात्र याबाबत स्वतः खडसे यांनी अधिकृत पक्ष राजीनामा व राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची घोषणा अद्याप पर्यंत केलेले नाही. त्यांच्या समर्थकांकडून मात्र गुरुवारी होणारे प्रवेशाची माहिती येऊ लागली आहे.

8 2
7 12
Screenshot 2020 10 12 12 19 40 67
Screenshot 2020 10 11 11 07 57 41 2

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये