राजकीय

म्हणून रखडलाय एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश

विनायक बेदरकर : सिंहासन NEWS

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चित झाल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत असले तरी खडसे यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. राष्ट्रवादीमध्ये मंत्रीपदासाठी असलेली भलीमोठी नेतेमंडळीं आणि सत्तेतील महत्वाचा असलेला घटकपक्ष शिवसेनेचा खडसेंना विरोध यामुळेच खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशास अडचणी येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपामध्ये नाराज आहे या नाराजीतून त्यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला असून ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या कट्टर समर्थकांकडून सांगण्यात येते मात्र वेळोवेळी खडसे याचा नकार देत आहेत.
खडसे भाजपामध्ये नाराज आहेत ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत मात्र राष्ट्रवादी मध्ये प्रवेशास खडसे यांना अडचणी येत आहे. खडसे राष्ट्रवादीमध्ये येणार असल्याने राष्ट्रवादीमधील नेते मंडळी अस्वस्थ झाले आहेत. मंत्रिपदासाठी रांगेत उभे असलेले राष्ट्रवादीचे नेते खडसे यांच्या प्रवेशाला विरोध करत आहेत.
तर दुसर्‍या बाजूला महाविकास आघाडीत महत्त्वाचा घटक असलेले शिवसेना खडसे त्यांच्याबाबत सूचक मौन म्हणून बाळगून आहे.जळगाव जिल्ह्यामध्ये एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे स्थानिक पातळीवरील नेते यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कमालीचा संघर्ष आहे. तसेच 2014 पासून एकनाथ खडसे आणि शिवसेना यांच्यातील संबंध मध्ये मोठा दुरावा आला आहे.
2014 साली युती तोडण्याची घोषणा खडसे यांनी केली होती. त्यानंतर सत्तेत एकत्र आल्यानंतरही शिवसेना आणि खडसे हे ठराविक हे एकमेकांपासून ठराविक अंतर राखून आहेत खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर खडसेंना मोठ्या मंत्रिपदाची जबाबदारी द्यावी लागेल. किंवा पक्षामध्ये मोठे पद द्यावे लागेल. खडसे पक्षात नवीन असल्याने पक्षामध्ये मोठे पद त्यांना कसे द्यायचे तसेच राष्ट्रवादीमध्ये मंत्रिपदासाठी नेतेमंडळींची मोठी रांग असल्याने खडसेंना डायरेक्ट मंत्रीपद कसे द्यायचे असा सूरही राष्ट्रवादीतून उमटत आहे.
या सर्व प्रकारावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुचक विधान करीत खडसे यांनीच काय तो निर्णय घ्यायचा आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सावध भूमिका घेत खडसे भाजपातच आहेत. असे म्हटले आहे.

8 3
Screenshot 2020 10 11 11 07 57 41 2
Screenshot 2020 10 12 12 19 40 67
7 5

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये