पुणे शहर

राजकीय पक्ष जातीमध्ये गुंतवतात, राज्यपालांची वक्तव्येही निषेधार्थ : राज ठाकरे

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 16 व्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राज्यपालांची वक्तव्ये निषेधार्थ असून महाराष्ट्रातील राजकीय पक्ष नागरिकांना जातीमध्ये गुंतवून ठेवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे म्हणाले, ‘तुम्हाला काय कळतं का? शिवाजी महाराज, रामदास स्वामी….आपला काय संबंध नसताना काहीही बोलून जायचं. शिवाजी महाराजांनी कधीही सांगितलं नाही की रामदास स्वामी माझे गुरू आहेत, ना रामदास स्वामींनी सांगितलं शिवाजी महाराज माझे शिष्य आहेत.

‘रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराज नसते, असं वक्तव्य करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वाद ओढवून घेतला. तसंच राज्यपाल कोश्यारी यांनी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. राज्यपालांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. आता राज ठाकरे यांनीही राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या पिढ्या त्यांची ही नाटकी पाहातायत. ते उद्या काय शिकतील? आणि या सगळ्या वातावरणात तुमची अपेक्षा आहे की लोकांनी तुम्हाला मतदान करावं?”, असं म्हणत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चिंतनाची गरज असल्याचं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

मनसेचं 16 वं वरीस इतरांसाठी धोक्याचं आहे पण मनसेसाठी मोक्याचं आहे, असं बाळा नांदगावकर म्हणाले. तसंच मुंबई आणि पुण्यातरी परिस्थिती पाहून वातावरण बदलतंय याचा अंदाज येतोय असं सांगत महापालिका निवडणुकीत नुसतं लढायचं नाही तर जिंकायचंय या हेतूने मैदानात उतरु आणि कामयाबी मिळवू, असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला. मेळाव्याला मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, आमदार राजू पाटील, अनिल शिदोरे, अमित ठाकरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये