मी निवडणूक लढविणार 28 तारखेला शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरणार – किरण दगडे पाटील

भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघातून किरण दगडे पाटील निवडणूक लढणारच
पुणे : भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक असलेल्या किरण दगडे पाटील यांनी महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ भाजपला की शिवसेनेला सुटेल हे माहित नाही.पण मी निवडणूक लढविणार आहे. 28 तारखेला शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.
किरण दगडे पाटील गेल्या तीन वर्षांपासून भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीची जोरदार तयारी करत आहेत. मात्र महायुतीच्या जागावाटपामध्ये हा विधानसभा मतदारसंघ कोणाला सुटणार हे अजून निश्चित झाले नाही. पण मी उमेदवारी अर्ज भरणार असून निवडणूक लढविणार असल्याचे सांगत किरण दगडे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पार्श्र्वभूमीवर बालवडकर यांनी माध्यमांशी संपर्क साधला आहे.

किरण दगडे पाटील म्हणाले, मी तीन वर्षांपासून या मतदारसंघात पक्षाचे काम करित असून काशी विश्वनाथ यात्रा, दिवाळी सरंजाम तसेच, महिलांसाठी विविध कार्यक्रम अशा छोट्या – मोठ्या उपक्रमाव्दारे या मतदारसंघात बांधणी केली आहे. या मतदासंघातील एक लाखाहून अधिक मतदारांना प्रत्यक्ष संपर्कात आणले असून या मतदारसंघातील मतदारांचा मलाच आशिर्वाद मिळणार आहे. एवढया वर्ष हा मतदार संघ विकासापासून वंचित राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मतदासंघाच्या विकासाचे व्हिजन माझ्याकडे आहे. आणि मतदारांची साथ मिळत आहे. त्यामुळे मी निवडणूक लढविण्यावर ठाम आहे.
मी येत्या सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्या दिवशी मोठे शक्ती प्रदर्शन करणार असून माझा मिञ परिवार, पक्ष संघटेतील माझे सहकारी आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. असे दगडे पाटील म्हणाले.












