महाराष्ट्र दिनानिमित्त शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर..

८ वर्षी तब्बल १७५ गडकिल्ले सर करणाऱ्या शर्विका म्हात्रेचा करण्यात आला सन्मान
पुणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी-चिंचवड शहर तर्फे आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ. मयुरी सुलभेवार – गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे तपासणी शिबिर घेण्यात आले.

यावेळी कु.शर्विका जितेन म्हात्रे हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गडकोटांवर दुर्गभ्रमंती करत अवघ्या ८ व्या वर्षी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शर्विका ने तब्बल १७५ गडकिल्ले सर करत एक अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. इतक्या लहान वयात कठीण चढाई असलेले किल्ले पार करत दुर्गभ्रमंतीत नवा आदर्श निर्माण केल्याबद्दल तिचे शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यकडून विशेष सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. व तिला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.



यावेळी शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष राज गोविंद जाधव तसेच पिंपरी-चिंचवड शहरचे पदाधिकारी, शहर अध्यक्ष अथर्व तावरे, उप-अध्यक्ष सिद्धार्थ तावरे, संघटक तन्मय कुदळे, कार्याध्यक्ष ऋषी शिरसाट, सरचिटणीस ओम गोधडे, सुनिल तावरे, हरिभाऊ कुदळे, कृष्णा कुदळे, अथर्व गाढवे, सक्षम साठे पिंपरीचे युवा नेते विशाल वाघेरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.






