पुणे शहर

विद्यार्थ्यांनी मनाची एकाग्रता वाढवून ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावा ; गुन्हे शाखेचे पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे

पुणे : विद्यार्थ्यांनी मनाची एकाग्रता वाढावावी व ध्येय ठेवून ते गाठण्यासाठी प्रयत्न करावा तसेच व्यायामाकडे ही लक्ष द्यावे , व्यायाम केला तर शरीर निरोगी राहून मन एकाग्र करायला मदत मिळते असे मार्गदर्शन करतानाच मोबाईलचा कमीत कमी वापर करण्याचा सल्ला ही पुणे, गुन्हे शाखेचे पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान च्या वतीने १० व १२ वी मधील गुणवंत ३०० विद्यार्थ्यांचा सत्कार पुणे, गुन्हे शाखेचे पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोठया संख्येने मुळशीतील विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

येनपुरे पुढे म्हणाले आम्ही ही खडतर परिस्थीत शिकलो. ध्येय गाठण्यासाठी मन एकाग्र करून अभ्यास केल्याने यश मिळविता आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन केले व जिद्द बाळगून प्रयत्न केले तर यश नक्की मिळू शकते हे लक्षात ठेवावे.

या प्रसंगी स्वागतपर भाषण राजेंद्र उभे यांनी केले तर प्रस्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन बंडू दातीर व आभार प्रदर्शन सिताराम तोंडे पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे संयोजन आम्ही मुळशीकर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.

Img 20230804 wa0004
Img 20230803 wa00041486684870724290474
Img 20230511 wa000228129

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये