पादचारी दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत महापौरांच्या प्रभागात मनसेचे आंदोलन

निवडणुक जवळ आली म्हणुन पुणेकरांची पादचारी दिन साजरा करुन फसवणुक होतेय का ? मनसेचा भाजपला सवाल
पुणे : गेली पाच वर्षापासुन बंद असलेला कर्वेनगर आणि गांधी भवन येथील भुयारी मार्ग पादचारी दिन म्हणुन साफसफाई करुन चालु केला.गेली कित्येक वर्ष मृत्युंजय मंदीर आणि कोथरुड अग्निशामक केंद्र येथील पादचारी उड्डान पुलावरुन रस्ता ओलांडनारा एकही पादचारी दिसला नाही फक्त बाणेर बालेवाडी आणि लक्ष्मीरोड म्हणजे संपूर्ण पुणे नाही. असा टोला लगावत मनसे कार्यकर्त्यांनी कोथरूड मध्ये महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रभागात आंदोलन केले.
वसंत मोरे म्हणाले, निवडणुका आल्या म्हणुन गेली दहा दिवसांपासुन रोडवरील पांढरे पट्टे झेब्रा क्राँसिंग याची रंगरंगोटी चालु आहे.संपूर्ण पुण्यातील सगळे फुटपाथ अतिक्रमण करुन वेढले गेलेत.जेष्ठ नागरिकांना सहज सुरक्षित रस्ता ओलांडता येईल अस पुण्यात कोठेच दिसत नाही.यामुळे रोज अनेक अपघात होतात

सुधीर धावडे म्हणाले, आज पुणे महानगरपालिका व महापौर यांच्या माध्यमातून पुणे शहरात पदपथावर “इव्हेंट” करण्यात आला.ज्याची पोलखोल करण्यासाठी व सत्य परिस्थिती पुणेकरांना दाखवण्या साठी मनसे रस्त्यावर उतरली.मनसेने कोथरूड मध्ये प्रभाग क्रमांक १२ मध्ये पोलखोल केली. यामध्ये महापौरांच्या प्रभागातच पदपथ गायब आहेत, आहेत तर त्यावर अतिक्रमणे, घाण आणि उरलेल्या जागेवर ह्यांची वाचनालय थाटून ठेवली आहेत.म्हणजे फक्त चकचकीत रस्त्यांवर नावाला इव्हेंट करायचं व स्वतःच्या प्रभागात नागरिकांना चांगले पदपथ नाही देऊ शकत हे झाकून ठेवायचे हे सिद्ध होते.”मनसे चा विकासाला कधीच विरोध नव्हता पण खोटे इव्हेंट करणाऱ्यांना आम्ही जनते समोर नक्की उघडे पाडू.”
या आंदोलनात मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे, कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे, शहर संघटक शैलेश जोशी, रमेश परदेशी, राजेंद्र वेडेपाटील, हर्षद खाडे, संजय काळे, किरण उभे, विराज डाकवे, गणेश शिंदे, अशोक कदम, सचिन विप्र, बाळा शिंदे, शाम बोऱ्हाडे, मयूर सुतार, अशोक दळवी व मनसे कोथरूड चे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.






