वारजे साहित्य कट्ट्यावर उद्या शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कवी संमेलन..

वारजे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वारजे साहित्यिक कट्ट्यावर कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी दिली.
वारजे मधील गंगाबाई धुमाळ बालोद्यानातील विरंगुळा केंद्रामध्ये होणाऱ्या या कवी संमेलनला अध्यक्ष म्हणून गझलकार प्रमोद खराडे तर प्रमुख पाहुणे म्हणून हास्य कवी बंडा जोशी उपस्थित असणार आहेत. उद्या रविवार १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता हे कवी संमेलन होणार आहे.
या संमेलनामध्ये ज्योत्स्ना चांदगुडे, वि. दा. पिंगळे, डी.के.जोशी, अशोक शहा, राजेंद्र वाघ, गजानन अटाणके, अरुणा गोखले, सुजाता बोधनकर, श्री चंद्रशेखर धर्माधिकारी ,धनश्री कानेगावकर, विनायक देशपांडे, महेश कुलकर्णी, साधना कुलकर्णी, किसन म्हसे, गुलाब सुर्यवंशी, अनंत खोंडे, आसाराम काजळकट, कृष्णकांत चेके, रामचंद्र जुन्नरकर, स्वाती गोखले, श्रीकांत वाघ, मंजुषा आचरेकट, सौ. गयावळ, जोत्स्ना तानवडे, संजय पावर आदी कवी या संमेलनात सहभागी होणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.







