App for Good Sleep : शांत झोप लागण्यासाठी ‘नींद’ ऍप

एक काळ होता जेव्हा आजी, आईच्या गोष्टी ऐकून आपल्याला कधी झोप लागायची ते समजत नव्हतं. पण हळूहळू काळ पुढे गेला आणि सगळं काही बदललं. धावपळ, ताणतणाव, सगळ्यांपेक्षा पुढे जायचंय मला या गडबडीत आपली शांत झोप कुठेतरी हरवून गेली. झोप येत नाही किंवा खूप उशिराने डोळा लागतो, निद्रानाश झालाय अशा अनेक तक्रारी आपण ऐकत असतो. या समस्येवर उपाय म्हणून पुन्हा एकदा गोष्ट ऐकायला सुरुवात केली तर…..? आता तुम्ही म्हणालं ते कसं काय? यावर उत्तर आहे ‘नींद ऍप’ !! अगदी बरोबर ‘नींद ऍप’ तुम्हाला झोपेची समस्या असेल, रात्री नीट झोप येत नसेल तर नींद ऍप आपल्याला मदत करते.
नींद ऍपवर नेमके काय?
लहानपणी आपण आजीच्या गोष्टी ऐकायचो आणि ती गोष्ट ऐकताना आपल्याला शांत झोप लागायची. अगदी त्याप्रमाणेच नींद ऍपवर तुम्ही गोष्टी ऐकू शकता.नींद एक असे ऍप आहे ज्यावर तुम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमीळ आणि तेलगु भाषेत कथा ऐकू शकता. मेडिटेशन, मनाला शांत करणारे संगीत तुम्हाला नींद ऍपवर ऐकायला मिळेल आणि हे सर्वकाही विनामुल्य आहे.

‘नींद’ ऍपचा जन्म कसा झाला
आयआयटी मुंबईमधून बीटेक केलेल्या सुरभी जैन तरुणीने ‘नींद’ ऍपची निर्मिती केलीय. सुरभी आणि तिच्या कुटुंबाला कोरोना झाला होता. सगळ्यांची झोप उडाली होती. त्यावेळी सुरभीला जाणीव झाली जे लोक सामान्यपणे झोपू शकत नाहीत त्यांना किती त्रास होत असेल. यासंदर्भात संशोधन केल्यावर समजलं शांत झोप येण्यासाठी उपायांची कमतरता आहे आणि यातूनच ‘नींद’ ऍपचा जन्म झाला. आपल्याला शांत झोप लागावी की जेणेकरून दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्न आणि उत्साहात होईल याच उद्देशाने सुरभीने नींद ऍप सुरु केलं.



जाहिरातींचा त्रास नसलेले ऍप
गेल्या वर्षी सुरभीने यूट्यूबवर हिंदीमध्ये चॅनल सुरु केलं. तिथे सुरभीला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दोन -तीन महिन्यांनी ‘नींद’ ऍप सुरू केलं.आता यूट्यूबवर गोष्ट ऐकणाऱ्या लोकांबरोबर संपर्क साधून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक एक शक्कल लढवत नींद ऍप विकसीत केलं. नींद ऍपवर तुम्ही पौराणिक, ऐतिहासिक, लोककथा, प्रेरणादायक, नॉस्टॅलॅजिक प्रकारातील कथा वाचू शकता. गोष्ट ऐकण्यापूर्वी मन कसं शांत करावं, कसं रिलॅक्स व्हावं ते सांगितलं जातं. गोष्ट ऐकताना कोणतीही जाहिरात तुम्हाला त्रास देत नाही. गोष्ट ऐकता ऐकता कधी झोप लागते ते कळतच नाही. तज्ज्ञ, अनुभवी मंडळी, क्रिएटर्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नींद ऍप वैशिष्ट्यपूर्ण बनलेले आहे.
‘नींद’ ऍपवरील कंटेंट मराठीत
नींद ऍपवर सुरुवातीपासूनच मातृभाषेत गोष्ट सांगण्यावर भर दिलाय. कारण झोपताना मेंदू रिलॅक्स होणं गरजेच असतं. आपण जेव्हा मातृभाषेत कथा ऐकतो त्यावेळी ती पटकन आपल्याला कळते. अगदी शांतपणे आपण की ऐकत असतो, आपल्या मेंदूवर ताण पडत नाही आणि जेव्हा रिलॅक्सेशन आणि झोपेचा विषय येतो, तेव्हा लोक मातृभाषेतून ऐकणं पसंत करतात. अनेक युजर्सनी ऍपवरील कंटेंट मराठी आणि अन्य प्रादेशिक भाषांमध्ये करण्याची मागणी केली होती. तेव्हा दीड महिन्यापासून ‘नींद’ ऍपवरील कंटेंट मराठीत उपलब्ध झाला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.
‘नींद’ ऍपचं पुढचं पाऊल
‘नींद’ ऍपचं पुढचं पाऊल म्हणजे शांत झोपेसाठी स्लीप गमीज (टॉफी), मिल्क मिक्स, स्लीप टी अशी उत्पादने आणलेली आहेत. याचे सेवन केल्यामुळे कोणताही साईड इफेक्ट तसेच त्याची सवय लागत नाही. जेव्हा कधी तुम्हाला वाटतंय झोप येत नाहीए. सकाळी खूप महत्त्वाचं काम आहे तुम्हाला ताजंतवानं वाटायला हवं तर एक गमीज रात्री तुम्ही घेवू शकता. ग्लूटेन फ्रि, सोया फ्री आणि शुद्ध शाकाहारी अशी ही उत्पादने आहेत. येत्या काळात रिलॅक्सेशन संदर्भात काही नवीन उत्पादने नींद ऍप घेवून येणार आहे. झोपेसह आता तणावमुक्त कसं जगता येईल यासाठी काही उत्पादने, मेडिटेशन यावर काम सुरु आहे. तेव्हा आता शांत झोप हवी असेल तर नींद ऍपवर गोष्ट ऐकायला विसरु नका.
शांत झोपेची अनुभूती घेण्यासाठी आणि नींद ऍप डाऊनलोड करण्यासाठी लिंक : https://neend.app/
लेखिका : अनिता किंदळेकर
(लेखिका या पत्रकार असून मागील 20 वर्षांपासून माध्यम क्षेत्राशी निगडित आहेत.)






