पुणे शहरमहाराष्ट्र

पुणे : महापालिकेच्या ज्या पायरीवर धक्काबुक्की झाली, त्याच पायरीवर सोमय्यांचा भाजपकडून सत्कार

पुणे : भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचं महापालिकेत जंगी स्वागत करण्यात आलं आहे. ज्या पायरीवर त्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली, तिथेच भाजपच्या वतीने सोमय्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक, सभागृह नेते गणेश बिडकर आणि नगरसेवक उपस्थित होते. यावेळी पालिकेबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. किरीट सोमय्या यावेळी म्हणाले, “पुण्यातील कोविड सेंटरचा ठेका मिळालेल्या कंपनीचा मालक चहावाला आहे. तसेच हा चहावाला केईएम रुग्णालयामागे असतो. ठाकरे सरकारने पुण्याच्या लोकांच्या जीवाशी खेळ केला. संजय राऊत यांची ही बेनामी कंपनी आहे. पुणे महापालिकेने त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत 4 ठेके दिले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या बेनामी कंपनी आहेत. त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये