पुणे शहर

टाळे लावू आंदोलनाचा प्रभाव ; वारजेतील कै. शामराव श्रीपती बराटे इंग्लिश माध्यम शाळेला मिळाले ७ शिक्षक

शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांचे होत होते नुकसान

वारजे : वारजे माळवाडी येथील महापालिकेच्या कै. शामराव श्रीपती बराटे इंग्लिश माध्यम शाळेत आवश्यकतेपेक्षा कमी शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. त्यामुळे शाळेला वाढवून शिक्षक द्या अन्यथा टाळे लावू आंदोलन करू असा इशारा पालक व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाला दिला होता. त्यानंतर आज टाळे लावू आंदोलनाच्या दिवशी शिक्षण विभागाकडून शाळेला सात शिक्षक वाढवून देण्यात आले आहेत. पालक एकवटल्याने आणि लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यामुळे शाळेला शिक्षक मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे.

शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ व विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी २६ ऑक्टोंबर ला शिक्षण प्रमुख उपशिक्षण प्रमुख उपयुक्त यांच्याबरोबर बैठक घेऊन तातडीने शिक्षक द्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला होता तर माजी नगरसेवक दिलीप बराटे यांनीदेखील शिक्षण विभागाचे पाठपुरावा करून शिक्षक मिळण्याबाबतची आग्रही भूमिका ठेवली होती. पालक ही आक्रमक झाले होते ३१ ऑक्टोंबर पर्यंत शिक्षक नाही मिळाले तर शाळेला टाळे लावू आंदोलन करण्याचा इशारा सर्वांकडून देण्यात आला होता.

Img 20231031 wa00117542375664116211236

आज शाळेबाहेर मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, माजी नगरसेवक दिलीप बराटे, माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी नगरसेवक सचिन दोडके, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ उपस्थित होते. यावेळी शाळेला सात शिक्षक वाढवून मिळाल्याने टाळ्या वाजवून आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी बाबा धुमाळ म्हणाले, पालक एकवटल्यामुळे आणि पाठपुराव्यामुळे सात शिक्षक वाढवून मिळाले ही आनंदाची बाब आहे. पण आज याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पालक, लोक प्रतिनिधी आंदोलनासाठी आले असताना प्रशासनाचा एकही आधिकरी उपस्थित नसून परिस्थितीच गांभीर्य त्यांना नसल्याचं दिसत त्यामुळे त्यांचा निषध व्यक्त करतो. आलेल्या शिक्षकांचे आपण स्वागत करू आणि सात शिक्षक मिळाले असले तरी ते पुरेसे नाहीत. तर प्रत्येक वर्गासाठी शिक्षक मिळाले पाहिजेत यासाठी आपण पाठपुरावा करू

दिलीप बराटे म्हणाले, शाळेला शिक्षक वाढवून मिळावे यासाठी आपण पाठपुरावा करत होतो. आज टाळे लावू आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत शिक्षण विभागाने सात शिक्षक वाढवून दिलेले आहेत. त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करू पण हे आंदोलन थांबलेले नाही शाळेत १४ वर्ग असून प्रत्येक वर्गाला दोन या प्रमाणे शिक्षक मिळाले पाहिजे अशी आपली भावना आहे व त्यासाठी आपण पाठपुरावा सुरू ठेवू

Img 20230717 wa0012281292712276676815194924

सचिन दोडके म्हणाले, शाळा बांधण सोपं असतं पण त्याचा शैक्षणिक दर्जा टिकवण शिक्षकांच्या हातात असतं. शाळेत आवश्यक तेवढे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पालक व लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन पाठपुरावा केल्याने शाळेला सात शिक्षक वाढून मिळाले आहेत.


शाळेची सात शिक्षक वाढवून मिळण्यापूर्वीची परिस्थिती
वारजे येथील कै. शामराव श्रीपती बराटे इंग्लिश माध्यम शाळेत पहिली ते सातवीच्या वर्गाच्या प्रत्येकी दोन- दोन तुकड्या आहेत. या १४ वर्गांसाठी किमान प्रत्येकी एक प्रमाणे १४ शिक्षक अपेक्षित आहेत. परंतु सध्या चार शिक्षक आहेत. त्यापैकी एका शिक्षिकेला आजारी आहेत. त्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षात त्यांच्याकडील वर्ग शिकवता येणार नाही. सध्या त्यांच्याकडे पाचवीचा म्हणजेच स्कॉलरशिपचा वर्ग देण्यात आला होता. त्यांनी त्याप्रमाणे तयारी देखील केली होती. परंतु आता त्या शाळेत येऊ शकत नाही. म्हणजे आमच्या शाळेत १४ वर्गांसाठी सध्या तीन कायम (परमनंट) शिक्षक आहेत. कंत्राटी शिक्षकांमध्ये अनिमियताता आहे.
त्यामुळे शाळेला किमान सात आठ कायम (परमनंट) शिक्षक आणि सात कॉन्ट्रॅक्ट टीचर देण्यात यावेत. यामध्ये शिक्षक देताना जास्तीत जास्त महिलांचा समावेश असावा अशी पालकांनी मागणी केली होती.

Img 20230511 wa0002282296555721650380460122

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये