क्रीडामहाराष्ट्र

खेळाडूंसाठी महत्वाची बातमी

राज्याच्या क्रीडा धोरणात सुधारणा होणार

मुंबई : राज्याच्या क्रीडा विकासासाठी क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या क्रीडा धोरणात आवश्यक सुधारणा करण्याच्या अनुषंगानं मंत्रालयात बैठक झाली असून त्यात वरील निर्णय घेण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती आणि अनुषंगिक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. आहे. या बैठकीतील चर्चेची माहिती अजित पवार यांनी ट्विटर द्वारे दिली आहे. 

खेळाचा सराव व स्पर्धेला हजर राहण्यासाठी खेळाडूंना सवलत देणं,माऊंट एव्हरेस्ट सर करणारे गिर्यारोहक, लिम्का-गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद झालेले स्पर्धक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, महाराष्ट्र केसरी विजेते मल्ल आदींनाही शासकीय सेवेत संधी देण्याबाबत सुधारित धोरणात विचार करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट संधी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा व्हावा, शासकीय सेवेत आल्यानंतर खेळाडूंना खेळावर लक्ष केंद्रीत करता यावं,या खेळाडूंच्या गुणवत्तेचा उपयोग नवीन खेळाडूंना मार्गदर्शन,दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी व्हावा याबाबत चर्चा झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीला मुख्य सचिव संजयकुमार, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सामान्य प्रशासनच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, महसुलचे उप सचिव माधव वीर, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरीया आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये