पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; कोरोनाबाबत मिळणार मोठा दिलासा…

पुणे : कोरोना काळात दिलासा दिणारी एक महत्त्वाची बातमी. पुण्यात आता रात्री अकरा वाजेपर्यंत हॉटेल्स खुली राहणार आहेत. तर सीनियर कॉलेजेस सुरू करायलाही परवानगी देण्यात आली आहे. सीनियर कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मात्र लसीचे दोन डोस बंधनकारक करण्यात आलेत.

पुण्यामधील नाट्यगृहं पन्नास टक्के क्षमतेने सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आढावा बैठक घेतली, त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे. खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मुभा देण्यात आली असून सोमवारपासून याची अंमलबजावणी होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील खासगी कार्यालये 100 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच पर्यटन स्थळे खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.









