दिलीप औटींच्या मार्गदर्शनाने उद्योजक मंत्रमुग्ध

पुणे : भारतीय जनता पक्ष उद्योग आघाडी पुणे शहर व उन्नती इन्वेस्ट्मेन्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर येथील यशदा सभागृहात इंटरनॅशनल बिजनेस कोच दिलीप औटी यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी भाजप पुणे शहर प्रवक्ते संदीपजी खर्डेकर उत्तर भारतीय मोर्चा प्रभारी श्वेता शालिनी उद्योग आघाडीचे प्रदेश सरचिटणीस विश्वजीत देशपांडे उद्योग आघाडीच्या शहराध्यक्षा अमृता देवगावकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमास शहरातील 300 पेक्षा अधिक उद्योजकांनी सहभाग नोंदवला बिजनेस स्ट्रॅटेजी कशा असाव्यात मार्केटिंग कसे करावे इत्यादी विषयांवर औटी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जॅक मेडिको चे रमेश शेवाळे उन्नती इन्व्हेस्टमेंट चे यश नगरकर गणेश हजारे VM3 मीडियाच्या वासंती मुळजकर श्री कुबेरा चे प्रकाश हमंद झेड प्रो सोल्युशन्स चे सागर देशमुख एथिक्स हॉलिडे चे अमेय गटणे ज्योतिषतज्ञ सुलक्षणा क्षीरसागर भाजप आघाडी चे पदाधिकारी रामदास गावडे स्मिता कुलकर्णी संतोष परदेशी अमृत श्रोत्री दीपा बडवे मंजुषा वैद्य दीपक कुमार सौरभ मेहंदळे आदींनी परिश्रम घेतले.




