शिवजयंतीनिमित्त एआरएआय टेकडीवर १०१ वृक्षांचे रोपण

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने वृक्षारोपण करण्यात आले. ‘एआरएआय’ टेकडीवर १०१ वृक्ष लावण्याची मोहीम रावबविण्यात आली, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी दिली.
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला एक शाश्वत देणगी दिली- स्वराज्य! त्यांच्या जयंतीला मानवंदनाही ‘शाश्वत’ देऊ या. शिवजयंतीला प्रत्येक झाडे लावू या, ती जगवू या! या मातीला शाश्वत देणं देण्याचा शिवरायांचा विचार जागवू या !’, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी तरुणांना केले होते. या आवाहनानुसार हा उपक्रम अपूर्व उत्साहाने राबविण्यात आला. पुण्यातील टेकड्या या पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यादृष्टीने वृक्षारोपणाच्या माध्यमातून वृक्ष संवर्धन देखील होणार आहे, असे गिरीश गुरनानी यांनी सांगितले.

या प्रसंगी अभिनेते गिरीश परदेशी (राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक व चित्रपट सेनेचे अध्यक्ष), सनी मानकर ( राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी), शुभम माताळे (राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोथरूड प्रभाग अध्यक्ष), संकेत शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट सेनेचे सरचिटणीस), अमोल गायकवाड (कोथरूड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष), रवी गाडे, आकाश नागरे, सुरज आढाव आधी उपस्थित होते.



