कोथरूड मध्ये ७५ बाल वक्त्यांनी जिवंत केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास..

शिवजयंतीनिमित्त बाल वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
कोथरूड : शिवजयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत आपल्या वक्तृत्व कौशल्याने ७५ बाल वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा इतिहास जिवंत केला. शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने शिवजयंती निमित्त आझादनगर कोथरूड येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत ७५ बाल वक्त्यांनी सहभाग नोंदवत आपल्या वक्तृत्व कौशल्याची चुणूक दाखवून दिली. बाल वक्ते ज्यावेळी आपल्या वक्तृत्वातून महाराजांच्या धगधगत्या पराक्रमाचा इतिहास मांडत होते त्यावेळी उपस्थितांच्या आंगवर शहारे उभे राहत होते.

या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराजांच पुस्तक व प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी शिवशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष राज गोविंद जाधव, हिंमाशू इंगोले, ऋषीकेश पाटील, सार्थक मोकाटे, तेजस राऊत, अथर्व गाढवे, सुयश माथवड, सदाशिव अलाट, प्रशांत चव्हाण, गणेश मांडके, निहाल शेख, प्रथम परीटे, निखील शिंदे, अभिषेक माने, रोहन गाढवे, विशू मोहोळ, विश्वास खवळे, श्रीरंग डोंगरे, साई ववले, मयूर मोहोळ, सुजित फाळके उपस्थित होते.
परिक्षक म्हणून प्रा. अरूण माने व प्रा. नामदेव अंबवडे यांनी काम पाहिले. अमीर शेख, भुषन रानभरे, विजय खळदकर, मनिषा करपे, शारदा विर यांच्या हस्ते विजेतांना सन्मानचिन्ह देण्यात आले. लहान मुलांमधील वक्तृत्व गुणांना वाव मिळावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे व नाचण्यांपेक्षा वाचनावर भर देऊन विचारांची शिवजयंती साजरी केली जावी या हेतूने ही स्पर्धा घेण्यात आल्याचे शिवशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष राज गोविंद जाधव यांनी सांगितले.






