कोथरूड मतदार संघात विजय डाकले ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे’ पुरस्कृत उमेदवार..

छत्रपती संभाजीराजे यांनी दिले पुरस्कृत करून पाठिंबा दिल्याचे पत्र..
पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विजय डाकले यांना महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले असून पुण्यात झालेल्या महासभेत पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते त्यांना पक्षाकडून पुरस्कृत केल्याचे पत्र देण्यात आले. विजय डाकले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून कोथरूड मतदारसंघातील निवडणुकीत चांगले वातावरण निर्माण केले असून आता महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून त्यांना पुरस्कृत करण्यात आल्याने त्यांची ताकद आणखी वाढली असल्याची चर्चा सुरू आहे.
शनिवारी एस एस पी एम एस कॉलेजच्या मैदानावर स्वराज्य पक्षाची विराट सभा पार पडली या सभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. सभेला जाताना डाकले यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. डाकले यांना स्वराज्य पक्षाकडून पुरस्कृत करण्यात आल्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे.
जाहीर सभेत बोलताना विजय डाकले यांनी छत्रपती संभाजी राजे यांचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून पुरस्कृत करण्यात आल्याने आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्यात बारा बलुतेदार, समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचे काम केले. त्यांचाच वारसा जपत छत्रपती संभाजीराजे आपले कार्य करत आहेत. त्यांनी आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोठी संधी दिली आहे आणि या संधीचे निवडणुकीत विजयात रूपांतर केले जाईल असा शब्द मी देतो.










