भाजपा महिला आघाडीतर्फे पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षा बंधन साजरे करण्यात आले.

पुणे : कायमच आपले रक्षण करणारे,आणि ज्यांच्या मुळे आपले जीवन सुरक्षित रहाते अश्या पोलीस बांधवांना शास्त्रीनगर येथील पोलीस स्टेशन येथे राखी बांधण्यात आली .हा कार्यक्रम कोथरूड महिला आधाडी तर्फे उपाध्यक्षा पल्लवी गाडगीळ यांनी आयोजित केला .
शास्त्रीनगर पोलीस स्टेशन येथे पल्लवी समीर गाडगीळ उपाध्यक्ष महिला मोर्चा कोथरूड पुणे फाउंडर ऑफ नीता केअर फाउंडेशन पुणे यांनी बँक व सॅनिटायझर च्या बॉटल या भेट दिल्या. पोलीस कर्मचारी व पोलिस अधिकारी बांधवां सोबत भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला.

या कार्यक्रमाला वर्षा पाटील सुप्रिया माझीरे या बीजेपी च्या पदाधिकारी उपस्थित होत्या. पल्लवी गाडगीळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना पोलिसांनी महिला सशक्तिकरण आणि त्यांचं संरक्षण याला ज्या प्रकारे महत्व दिला आहे त्यासाठी सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचे आभार मानले.



