पुणे शहर

कोथरुड मधील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यानाचे उद्घाटन ; महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नातून उद्यानाची निर्मिती

कोथरुड : जे काय चांगले प्रकल्प पुण्यात होतील ते माझ्या प्रभागात, माझ्या कोथरुडमध्ये पहिल्यांदा कसे होतील यासाठी मी प्रयत्न केला. या भागातील नागरिकांनी आम्हाला जी संधी दिली जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न आम्ही केला असे  प्रतिपादन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.

डहाणूकर कॉलनीत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यातून महापालिकेच्या वतीने साकारण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यानाचे उद्घाटन आज परिसरातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिनेता प्रवीण तरडे, नगरसेविका हर्षाली माथवड, वासंती जाधव, मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्त्रबुध्दे, नगरसेवक जयंत भावे, मिताली साळवेकर, मोनिका मोहोळ, डहाणूकर कॉलनी परिसरातील सोसायट्यांचे पदाधिकारी, नागरिक आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp image 2021 11 23 at 2. 46. 54 pm

मोहोळ म्हणाले शहरात जी मोजकी मोठी उद्याने आहेत त्या उद्यानात आता या आणखी एका उद्यानाचा समावेश झाला आहे. सुरवातीच्या काळात स्थायी समिती अध्यक्ष व नंतर महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने प्रभागात  चांगले प्रकल्प आणण्यास मदत मिळाली. कोरोना काळात शहरात काम करताना, परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असताना प्रभागातील नागरिकांशी संवाद कमी झाला असेल पण विकास कामे मात्र थांबली नव्हती.

पुढे ते म्हणाले, अनेक विकासाची कामे प्रभागात करत असताना रस्त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवणे, क्रीडा संकुल, भाजी मंडई इमारत उभारणे, महापालिकेची अद्यावत लॅब सुरू करणे, नळ स्टॉप चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाण पुल उभारणे अशी कामे करताना नागरी समस्या सोडवण्यावर भर दिला. डहाणूकर कॉलनीत करण्यात आलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यान नागरिकांना नक्कीच लाभदायक ठरणार असल्याचे मोहोळ म्हणाले.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये