पुणे शहर

PUNE : दहावीच्या विद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेमातून चाकूने वार; मुलगी गंभीर जखमी

पुणे : दहावीत शिकणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर प्रेमवीराने शाळेच्या आवारात शिरून चाकूने वार केल्याचा भीषण प्रकार पुण्यात घडला आहे. एकतर्फी प्रेमप्रकरणातून हा प्रकार युवकाने केल्याचा पोलिसांना संशय आहे. मुलीवर वार केल्यानंतर त्या मुलानेदेखील विष प्राशन केले. कपील भट्ट (वय. 22) असे हल्ला करणाऱ्या या तरुणाचे नाव आहे.

वडगावशेरी येथील ईनामदार शाळेसमोर ही घटना सकाळी अकरा वाजता घडली आहे. गेल्या दीड महिन्यापासून आरोपी मुलगा मुलीला त्रास देत होता.  तिच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकारात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार घडल्यानंतर आरोपी मुलाने तेथून पळ काढला होता. त्यानंतर त्याने विषप्राशन केले. त्याच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू केला आहे. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये