मुंबई अस्थिर करण्याऐवजी विकासाकडे लक्ष द्या मुंबईच्या महापौरांचा भाजपाला टोला..

मुंबई मालाड : टिपू हा संशोधनाचा विषय न राहता दोन धर्मांमधला भेदाचा झाला आहे. म्हैसूरपासून १००० किलोमीटर दूर असलेल्या मुंबईत त्याच्या नावाने दोन मतप्रवाहांचा शिमगा सुरू आहे . मुंबई येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांचा कठोर शब्दात भाजपाला टोला .
मुंबईच्या मालाड क्रीडा संकूलाला टिपू सुलतानच्या नावावरून वाद दिसून आले या क्रीडा संकुलनाच्या उद्घाटन आधी बजरंग दलाच्या आंदोलकानी आंदोलन देखील केले. या आंदोलनामध्ये आंदोलक आणि पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला.
पेडणेकर म्हणाल्या, ज्या गोष्टी घडल्याचं नाहीत त्यावरून मुंबईची सुरक्षा बिघडवली जातेय. मैदानाला टिपू सुलतान नाव देण्यावर भाजपाकडून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहेत. याआधी मुंबईच्या रस्त्यांना टिपू सुलतान यांचं नाव दिलं तेव्हा भाजपाने विरोध नाही केला . टिपू सुलतान यांचं नाव २००१ आणि २०१५साली मुंबईत दोन रस्त्यांना दिली गेली तेव्हा भाजपान का नाही विरोध केला. २०१३ मध्ये रस्त्याला टिपू सुलतान यांचं नाव दिलं तेव्हा अनुमोदन अमित साटम यांनीच दिलं. दंगल कोणाला पाहिजे ? दंगल होईल असं बोलणाऱ्यानी करून तरी दाखवावी अस खडसावून म्हंटला. तसेच त्यांनी भाजपाला देत म्हंटल्या मुंबई अस्थिर करण्याऐवजी विकासाकडे लक्ष द्या.







