
नवी दिल्ली : Covishield आणि covaxin या दोन अँटी- कोविड 19 लसी भारताच्या औषध नियामकांकडून मान्यता मिळाल्यावर विक्रीसाठी लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. गेल्या एक वर्षांपासून नागरिक जवळच्या सरकारी दवाखान्यातून किवा लसीकरण केंद्रातून covishield आणि covaxin चे डोस घेत होते. पण ह्या दोन्ही लसीचे डोस लवकरच मेडिकल मध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
या दोन्ही लसींना लवकरच त्यांच्या विक्रीसाठी भारताच्या औषध नियामकाकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. याची किंमत प्रति डोस 275 रुपये आणि 150 रुपये अतिरिक्त सेवा शुल्क आकारले जाऊ शकते. म्हणजे एकूण 420 ते 450 पर्यंत एका डोसची किंमत असणार आहे.







