पुणे शहर

भारतीय जनता पक्षाने दुसऱ्याच्या कर्तृत्वाचे श्रेय घेऊ नये : प्रशांत जगताप

कर्वेनगरमधील कार्यक्रमात प्रशांत जगताप यांचा सल्ला

पुणे : महानगरपालिका निवडणुका तोंडावर आले असतांना पायाखालची वाळू सरकतांना पाहून भारतीय जनता पक्ष दुसऱ्यांनी केलेल्या विकासकामाचे देखील श्रेय घेऊ पाहत आहे. पंरतू नागरिक सुज्ञान असून आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.

नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांच्या पुढाकारातून आणि स्वप्नील दुधाने यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 31 मधील सर्वे नंबर 14 मधील जावळकर वस्ती येथील पुणे मनपाच्या 29 गुंठे आरक्षीत जागेवर प्रस्तावित असलेल्या अत्याधुनिक क्रिडा प्रशिक्षण क्रेंदाचे आज जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी जगताप बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेविका लक्ष्मी दुधाने, राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने, नगरसेविका सायली वांजळे, प्रदीप देशमुख, कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कांबळे, प्रमोद शिंदे, ज्योती सुर्यवंशी, अश्विनी माने, सुक्ष्मा सातपुते आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशांत जगताप म्हणाले, भारतीय जनता पक्षाने पुण्यातील मोक्याच्या जागा 99 वर्षांच्या करारावर देऊन सरळ सरळ विकायला काढल्या होत्या, परंतु राष्ट्रवादी पक्ष महापालिकेत निभावत असलेल्या विरोधी पक्षाच्या जागृक भुमिकेमुळे भाजपाचा हा डाव आम्ही हाणून पाडला. सत्तेत असतांना विकास काम न करता केवळ टक्केवारीचे राजकारण आजवर पुणे मनपातील सत्ताधीरी भाजपने केले . राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते काही विकास काम करु पाहत आहेत तर त्यांना पाठिंबा देण्याऐवजी त्या विकास कामांमध्ये विघ्न आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो आहे. लक्ष्मी दुधाने आणि स्वप्नील दुधाने यांनी राबवलेल्या विकास कामांइतके प्रकल्प भाजपने दाखवून द्यावे असे आवाहन ही जगताप यांनी यावेळी केले.

Img 20220123 wa0404

स्वप्नील दुधाने यावेळी स्वागतपर प्रास्ताविकात म्हणाले, पुणे महानगरपालिका यंत्रणेशी सातत्याने पाठपुरावा करुन रितसर कायदेशीर प्रक्रियेद्वारे हा भूखंड हस्तांतरीत करुन घेण्यात आला असून या 29 गुंठे च्या प्लाॅटवर क्रीडा प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. कर्वेनगरच नव्हे तर कोथरुड भागात ही इतके अत्याधुनिक क्रीडा प्रशिक्षण केंद्र नसेल असे केंद्र येथे उभारण्यात येणार आहे. मातीचे मैदान, तायक्वांदो, कराटे, ॲरोबिक्स, योगा, जिम्नॅशियम, कुस्ती, खेळाडू करिता समुपदेशन सभागृह आदी सेवा सुविधांनी हे क्रीडा प्रशिक्षण केंद्र परिपूर्ण असेल. या भागात होत असलेले विकास काम भारतीय जनता पक्षाला बघवत नसल्याने विकासकामांत खोडे घालून अडथळ्यांचे राजकारण केले जात आहे.

ह्या खालच्या प्रतीच्या राजकारणावर आम्ही मात करुन विकासकामांचा धडाका सरुच ठेवणार आहोत. कारण आमची बांधिलकी नागरीकांशी आणि पक्षाशी आहे. या परिसराचा सर्वांगीण विकास आणि सेवा-सुविधा उपलब्ध करुन देणे हे आम्ही आमच्या कर्तव्याचा भाग मानतो असे दुधाने यांनी म्हंटले आहे. पुणे मनपाच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी मनोगत व्यक्त करीत उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये