पुणे शहर

जगदाळे स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित अमोल बालवडकर ट्रॉफी – जगदाळे क्रिकेट लीग (JCL) सिझन 8 स्पर्धेचा शुभारंभ

पुणे : जगदाळे स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित अमोल बालवडकर ट्रॉफी – जगदाळे क्रिकेट लीग (JCL) सिझन 8 या भव्य स्पर्धेचा शुभारंभ कम्फर्ट झोन, पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाला नगरसेवक अमोल बालवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

नगरसेवक अमोल बालवडकर यांनी युवा खेळाडूंना प्रोत्साहन देताना सांगितले की, “क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी माझा पाठिंबा कायम राहील. सर्व खेळाडूंना उत्तम खेळासाठी मनापासून शुभेच्छा!” या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना त्यांची क्षमता विकसित करण्यास मोठी मदत होणार आहे. क्रीडा क्षेत्रासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी मी सदैव तयार आहे. पुणे महापालिकेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रासाठी आम्ही कायम मदत करत आहोत.

Img 20251125 wa01788344877527023851533

आयपीएलच्या धर्तीवर आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा पुढील पिढीतील गुणवंत क्रिकेटपटूंना घडविणारे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांच्या नावावर आधारित संघ, प्रोफेशनल ऑक्शन आणि रोमांचक सामने यामुळे स्पर्धेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. 

विशेष म्हणजे, या स्पर्धेतून अंडर-13 खेळाडूंना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) इन्व्हिटेशनल लीगमध्ये संधी मिळण्याचा मार्ग खुला होतो. त्यामुळे क्रिकेटपटूंचा सदरील स्पर्धेचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला दिसला.

यावेळी जगदाळे स्पोर्ट्स फाउंडेशनचे संचालक सौरभ जगदाळे, पदाधिकारी, पालक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये