पुणेकरांना लसीकरणाची माहिती आता घरबसल्या फक्त एका क्लिकवर…

पुणे : पुणे शहरात नागरिकांना लसीकरण केंद्रावर गेल्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळते. त्या पार्श्वभूमीवर पुणेकर नागरिकांना उद्या कोणत्या केंद्रावर किती डोस मिळणार, ही माहिती घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी संकेतस्थळाचे कार्यान्वित करण्यात आले असून पुणेकरांना लसीकरणासंदर्भातील सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.(Pune residents now know about vaccination at home with just one click)
लसीकरणासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती आता https://www.punevaccination.in/ या संकेतस्थळावर मिळणार असून याचे लोकार्पण महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे महानगरपालिका आणि एमसीसीआयए यांच्या माध्यमातून या डॅशबोर्डची निर्मिती करण्यात आली आहे.
यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेशजी बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ, आयुक्त श्री. विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होते.
काय असेल डॅशबोर्डवर?
नागरिकांनी या डॅशबोर्डवर क्लिक केल्यावर त्यांनी वयोगट, लशीचा प्रकार (कोव्हॅॅक्सीन, कोव्हीशिल्ड ) डोसचा प्रकार (पहिला व दुसरा ), लसीकरण केंद्र (सरकारी, खाजगी ) असे पर्याय क्लिकद्वारे निवडायचे आहेत. त्यानंतर संबधित व्यक्तीला शहरातील सर्व लसीकरण केंद्राची माहती लोकेशनसह उपलब्ध
होणार आहे. त्या त्या लसीकरण केंद्रावर क्लिक केल्यास तेथे कुठला लस व डोस उपलब्ध आहे, याचीही माहिती मिळणार आहे.







