आरोग्य

कोरोना नंतरची गुडघेदुखी, सांधेदुखी व चिकनगुणियाची साथ

डाॅ.सचिन नागापूरकर
अस्थीरोग तज्ञ

आज जगभरात कोरोना संसंर्ग रूग्णांची संख्या कमी होत असली तरी तो संसंर्ग पूर्णपणे गेलेला नाही. आज दवाखान्यात येणाऱ्या रूग्णांमध्ये ज्या रूग्णांना मागील काही महिन्यांपूर्वी कोरोना संसंर्ग होऊन गेला आहे व ते कोरोना च्या लक्षणांमधून जरी बरे झाले असतील अथवा ज्या लोकांना कदाचित कोरोना व्हायरस चे निदान झाले नसेलही पण कोरोना ची लक्षणे येऊन गेली आहेत अश्या रुग्णांना  एक लक्षण  बघायला मिळते आहे ते म्हणजे गुडघेदुखीचा त्रास वाढला आहे. कंबरदुखी, टाच दुखणे, हाताची बोटं व मनगट दुखणे आखडणे, थकवा येणे, थोडे जरी चालणे झाले तरी मांड्या व पायाची पोटरी दुखणे
अशी लक्षणे दिसू लागली आहेत. knee pain, joint pain

कोरोना विषाणू संसर्ग नंतर विषाणू जन्य सांधेदुखी Post Viral arthralgia or Arthritis होण्याचे प्रमाण वाढतेच. काही रुग्णांना सध्या थंडी ताप आल्यानंतर काही दिवसात सांधेदुखी ची लक्षणे दिसत आहेत हे चिकनगुणिया आजाराची लक्षणे असू शकतात. डास चावल्यानंतर हा चिकनगुणिया व्हायरस आजार होतो. साधारणपणे 3 ते 5 दिवस ताप येणे….रक्त तपासणी मध्ये मलेरिया अथवा डेंग्यूची लागण नाही असे दिसून येते, त्यावेळी चिकनगुणिया साठीची विशेष तपासणी Ig G ,IgM, ELISA करणे आवश्यक होते.

ज्या रूग्णांना कोरोना संसंर्ग अथवा कोरोनाची लक्षणे येऊन गेलेली आहेत व ज्यांना पुर्वी सुद्धा सांधेदुखीचा त्रास होत होता  व आता सांधेदुखी वाढलेली आहे अशा रूग्णांनी आपल्या डाॅक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गरजेप्रमाणे हलके व्यायाम करणे आवश्यक आहे. कारण लाॅकडाऊनच्या काळात घरातच बसून असल्यामुळे सांध्याचे व्यायाम होत नव्हते. आता लाॅकडाऊन उठवला गेला आहे. काही स्वतःची काळजी घेऊन व्यायाम करणे चालणे सुरू केले पाहिजे.

ज्या रूग्णांना कोरोना संसंर्ग होण्याआधी कोणताही सांधेदुखीचा/ टाच दुखी/मनगटाच्या हालचाली मधील बदल हातांची बोटे कडक होणे असा जर त्रास होत असेल तर नक्कीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. चिकनगुणिया आजार तर नाही ना हे पण तपासले पाहीजे. विनाकारण वैद्यकीय सल्ला न घेता वेदनाशामक औषधे घेणे टाळावे. बर्याच वेळा हा Post Viral Arthralgia चा त्रास काही ठराविक औषधे व व्यायाम व आराम घेऊनच बरा होतो.

पाणी पिण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या..फळांचा वापर ,लिंबू सरबत असा योग्य तो आहार करणे आवश्यक आहे. रोज ठराविक कालावधी मध्ये चालणे असेल, सांध्याची हालचाल वाढवणारे स्ट्रेचिंग पद्धतीचे व्यायाम असतील ते करणे आवश्यक आहे. घरात बसून काम असल्यामुळे बर्याच जणांची शारिरीक हालचाल मंदावली आहे परिणामी वजन वाढणे, हालचाल नसल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते आहे. एकाच जागी जास्त कालावधी साठी बसून ऑफिस काम केल्यामुळे कंबर, मान दुखण्याचे प्रमाण वाढते आहे.
कदाचित अजून पुढील काही महिने तरी आपल्याला लाॅकडाऊन चे नियम पाळणे गरजेचे आहे.

घरामध्ये बसूनच कामे करावी लागणार आहेत.
त्यामुळे त्यातलीत्यात स्वतःच्या शरिराची हालचाल व्यवस्थित राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
डाॅक्टरांचा योग्य तो सल्ला व नियमित व्यायाम व सकस आहार गरजेचा आहे.

Img 20201213 wa0074
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये